तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमातील सहावा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. लखनऊने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. चेन्नईच्या डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराजने गायकवाड या सलामी जोडीने या संधीचा फायदा घेत शानदार सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्सचा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड याने आपला धमाका सुरुच ठेवला आहे. ऋतुराजने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे.
ऋतुराजने अवघ्या 25 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं आहे. ऋतुराजने या अर्धशतकी खेळीमध्ये 2 चौकार आणि 4 षटकार ठोकले आहेत. ऋुतराजचं हे या मोसमातील सलग दुसरं तर आयपीएल कारकीर्दीतील 12 वं अर्धशतक ठरलं आहे. ऋतुराजने याआधी आयपीएलच्या 16 व्या मोसमातील सलामीच्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. ऋतुराजने गुजरात विरुद्ध 23 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केलं होतं. ऋतुराजचं गुजरात विरुद्धचं ते अर्धशतक हे त्याच्या कारकीर्दीतील वेगवान अर्धशतक ठरलं होतं.
ऋतुराज गायकवाड याचं अर्धशतक
? to ? half-centuries for @Ruutu1331 ??
He's had a fabulous start to the season ?
Follow the match ▶️ https://t.co/buNrPs0BHn
#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/oMaRXP598V— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023
ऋतुराजकडून लखनऊ विरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र ऋतुराज 7 धावा जोडल्यानंतर 57 रन्स करुन ऋतुराज आऊट झाला. ऋतुराजने 31 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 चोकारांच्या मदतीने एकूण 57 रन्स केल्या.
तसेच ऋतुराजने गुजरात विरुद्ध 92 धावांची खेळी करत शानदार सुरुवात केली होती ऋतुराजला मोसमातील पहिल्याच सामन्यात शतक ठोकण्याची संधी होती. मात्र अंपायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे ऋतुराजचं अर्धशतक हे 8 धावंनी हुकलं होतं. दरम्यान ऋतुराज या मोसमात सर्वाधिक धावा करण्याबाबत आतापर्यंत पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे तो ऑरेन्ज कॅप होल्डर आहे. ऋतुराजने दोन्ही सामन्यात अनुक्रमे 92 आणि 57 अशा एकूण 149 धावा केल्या आहेत.
चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन) डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कर्णधार), कायल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि आवेश खान.