Cricket : 6,6,6,6,6,6,4,4,4,4,4, ग्लेन मॅक्सवेल याची विस्फोटक खेळी, रोहितचा महारेकॉर्ड ब्रेक

| Updated on: Jan 20, 2025 | 9:31 PM

Glenn Maxwell Break Rohit Sharma Record : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक आणि अनुभवी ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने टीम इंडियाचा रोहित शर्मा याचा महारेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Cricket : 6,6,6,6,6,6,4,4,4,4,4, ग्लेन मॅक्सवेल याची विस्फोटक खेळी, रोहितचा महारेकॉर्ड ब्रेक
rohit sharma and glenn maxwell
Follow us on

ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने या स्पर्धेतील 40 व्या सामन्यात धमाकेदार खेळी केली. मेलबर्न स्टार्ससाठी खेळताना मॅक्सवेल याने होबार्ट हरिकेन्स विरुद्ध 19 जानेवारीला झंझावाती आणि विस्फोटक खेळी केली. मॅक्सवेलच्या या खेळीच्या जोरावर मेलबर्न स्टार्सने होबार्ट हरिकेन्सवर 40 धावांनी मात केली. ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात 32 चेंडूत 76 धावा केल्या. मॅक्सवेलने या खेळीसह टीम इंडियाच्या रोहित शर्मा याचा महारेकॉर्ड ब्रेक केला.

रोहित शर्माचा महारेकॉर्ड ब्रेक

ग्लेन मॅक्सवेलने 76 धावांच्या खेळीत 5 चौकार आणि 6 षटकार लगावले. ग्लेनने या खेळीत चौकार आणि षटकारांच्या मदतीने 11 चेंडूत 56 धावा केल्या. तर 20 धावा फक्त धावून घेतल्या. ग्लेनने या खेळीतील 6 सिक्ससह रोहित शर्मा याला मागे टाकलं. ग्लेन मॅक्सवेलने यासह रोहित शर्माला मागे टाकत टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारा सातवा फलंदाज ठरला. तर रोहितची आठव्या स्थानी घसरण झाली. ग्लेन मॅक्सवेल याने आतापर्यंत 458 टी 20 सामन्यांमध्ये 528 सिक्स लगावले आहेत. तर रोहितच्या नावावर 448 सामन्यांमधील 435 डावात 525 षटकार खेचले आहेत.

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स

  • ख्रिस गेल : 1056
  • किरॉन पोलार्ड : 901
  • आंद्रे रसेल : 729
  • निकोलस पूरन : 593
  • कॉलिन मुनरो : 550
  • एलेक्स हेल्स : 538
  • ग्लेन मॅक्सवेल : 528
  • रोहित शर्मा : 525

सामन्यात काय काय झालं?

दरम्यान ग्लेन मॅक्सवेल याच्या नाबाद खेळीच्या जोरावर मेलबर्न स्टार्सने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 219 धावा केल्या. मात्र होबार्ट हरिकेन्सचं 19.3 ओव्हरमध्ये 179 रन्सवर पॅकअप झालं. मॅक्सवेलला त्याच्या या खेळीसाठी सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आलं.

मेलबर्न स्टार्स प्लेइंग ईलेव्हन: मार्कस स्टोयनिस (कर्णधार), थॉमस फ्रेझर रॉजर्स, सॅम हार्पर (विकेटकीपर), ब्यू वेबस्टर, ग्लेन मॅक्सवेल, हिल्टन कार्टराईट, टॉम करन, जोएल पॅरिस, उसामा मीर, मार्क स्टेकेटी आणि पीटर सिडल.

होबार्ट हरिकेन्स प्लेइंग इलेव्हन: नॅथन एलिस (कर्णधार), कॅलेब ज्वेल, मिशेल ओवेन, चार्ली वाकिम, बेन मॅकडर्मॉट, निखिल चौधरी, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, कॅमेरॉन गॅनन आणि मार्कस बीन.