कॅनबेरा : क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. क्रिकेटमध्ये फलंदाज सध्या विचित्र प्रकारे फटकेबाजी करताना दिसून येतात. वाकडेतिकडे शॉट मारुन रन्स करण्याच्या उद्देशाने या नवनवीन फटक्यांचा उदय होतो. काही वर्षांपूर्वी पल्लू स्कूप, अलटी पलटी शॉट आणि अपर कट असे काही शॉट आपण पाहिले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा एबी डी व्हीलियर्स मैदानात चौफेर फटकेबाजी करु लागला. बॉलरने बॉल कसाही टाकोत एबीने ठरवलं की त्याच दिशेला बॉल फटकवायचा. आता एबी प्रमाणे टीम इंडियाचा सूर्यकुमार यादवही मैदानातील चारही बाजूला वाटेल तसे नवनीव फटके मारतोय. सूर्याने आपली शैली तयार केली. त्यामुळे सूर्या एबीपेक्षा झकास खेळतोय, असं क्रिकेट चाहते म्हणतायेत.
अनेक फलंदाज सूर्याप्रमाची कॉपी करुन शॉट मारायचे प्रयत्न करतायेत. मात्र सूर्याप्रमाणे प्रत्येकालाच फटकेबाजी जमण्यासारखं नाही. शक्कल करायला अक्कल लागते, असं म्हणतात. त्याप्रमाणे सूर्यासारखे फटके मारायला परफेक्ट टायमिंग लागतं. मात्र याचा विसर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला पडला. सूर्याप्रमाणे स्कूप शॉट मारायच्या नादात फलंदाजाच्या हेल्मेटवर बॉल जाऊन आदळला. हेल्मेट असल्याने पुढील अनर्थ टळला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल होतोय.
सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग स्पर्धा सुरु आहे. उस्मान ख्वाजा ब्रिसबेन हिटचं प्रतिनिधित्व करतोय. उस्मान सलामीसाठी आला. डावातील चौथ्या ओव्हरमध्ये उस्मानने सूर्याप्रमाणे स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र उस्मानचा तो प्रयत्न फसला. उस्मान स्कूप मारण्यासाठी गेला मात्र बॉल बॅटवर न लागता थेट हेल्मेटवर जाऊन आदळला. हेल्मेट असल्याने सुदैवाने उस्मानला काही इजा झाली नाही. उस्मानने जेसन बेहरनडॉर्फच्या वाईड बॉलवर स्कूप मारायचा प्रयत्न केला होता.
उस्मान थोडक्याच बचावला
? “Good ball!”
Usman Khawaja followed Jason Behrendorff wide, and cops one in the helmet for his troubles @KFCAustralia #BBL12 #BucketMoment pic.twitter.com/b1oIHJPi4B
— KFC Big Bash League (@BBL) January 11, 2023
उस्मानने हिंमती दाखवत संधी साधून स्कूप मारायचा प्रयत्न केला. मात्र त्याला ते काही जमलं नाही. सूर्यकुमार यादव स्कूप शॉट खेळतो ते सहजासहजी नाही. यासाठी सूर्याची अनेक वर्षांची मेहनत आहे. मुंबईत जवळपास 3 महिने पाऊस असतो. या कालावधी दरम्यान सूर्या हिमाचल, जम्मू यासारख्या ठिकाणी सरावासाठी जायचा आणि तिथे सराव करायचा.
दरम्यान बिग बॅश लीगमध्ये उस्मान स्वस्तात माघारी परतला. उस्मानला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्याला त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. उस्मानने 23 बॉलमध्ये 2 चौकारांसह 28 धावांची खेळी केली. या सामन्यात ब्रिसबेन हीटने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 155 धावा केल्या. तर पर्थ स्कॉचर्स 16.2 ओव्हर्समध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात 156 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं.