बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. श्रीलंकेविरूद्ध टीम इंडिया तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. गौतम गंभीरचा कोच म्हणून पहिला दौरा असून या दौऱ्यामध्ये टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याची कॅप्टन म्हणून निवड केली गेलीये. शुबमन गिल याच्याकडून कॅप्टनपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. हार्दिक पंड्या याच्या नावाची अधिक चर्चा होती पण गौतम गंभीर आणि निवड समितीने सूर्यकुमार यादव याच्याकडे जबाबदारी दिली आहे. टी-20 संघातून रुतुराज गायकवाड याला स्थान मिळालं नाही. टी-20 मालिका 27 जुलै ते 30 जुलै आणि एकदिवसीय मालिका 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ब्रेक घेतल्याच्या बातम्यांनीही पूर्णविराम लागला आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी विराटचा संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मात्र विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्याकडून उपकर्णधारपद काढून ते शुबमन गिलला मिळालं आहे. शुबमन गिल वनडे आणि टी-20 चा उपकर्णधारपद असणार आहे.
श्रेयस अय्यरचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. अय्यरला काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयने केंद्रीय करारातून वगळले होते, मात्र आता तो वनडे खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. वनडे संघात हर्षित राणाच्या नावाचाही समावेश आहे. या मालिकेत त्याला भारताकडून पदार्पणाची संधी मिळू शकते.
🚨 News 🚨#TeamIndia‘s squad for 3 T20Is & 3 ODIs announced
Read More 🔽
— BCCI (@BCCI) July 18, 2024
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ: (India ODI Squad against Sri Lanka)
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के. एल. राहुल (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ : (India T20I and Squad against Sri Lanka)
सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), जैस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज.