T 20 World Cup 2023 : टी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला मिळाली संधी?

| Updated on: Dec 28, 2022 | 9:17 PM

बीसीसीआयने (Bcci) टी 20 वर्ल्ड कप 2023 साठी T 20 World Cup 2023) 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे.

T 20 World Cup 2023 : टी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला मिळाली संधी?
Image Credit source: फाईल फोटो
Follow us on

मुंबई : आगामी आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी (Icc Womens T 20 World Cup 2023) आणि दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेसाठी बीसीसीआयने (Bcci) भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीायने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने मुख्य 15 आणि राखीव 3 अशा एकूण 18 सदस्यीय संघ जाहीर केलाय. या वर्ल्ड कपमध्ये हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. (bcci announced india squad for icc womens t20 world cup 2023 and tri series in south africa)

यंदा टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन हे दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलंय. या वर्ल्ड कप स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने गेल्या वर्ल्ड कपमध्ये फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र थोडक्यासाठी वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा महिला ब्रिगेडचा यंदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न पू्र्ण करण्याचा मानस असणार आहे.

हे सुद्धा वाचा

पहिलाच सामना पाकिस्तानशी

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तसेच अंतिम सामन्याचं आयोजन हे 26 फेब्रुवारीला करण्यात आलंय. अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आलाय. कोणत्याही कारणामुळे 26 तारखेला सामना पार पडला नाही, तर तो सामना 27 फेब्रुवारीला म्हणजेच राखीव दिवशी खेळवण्यात येईल.

टी 20 महिला वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया

महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटीया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), जेमिमा रॉड्रिग्स, हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणूका ठाकूर, अंजली सर्वनी, पूजा वस्त्रकार (फिटनेस टेस्ट आवश्यक), राजेश्वरी गायेकवाड आणि शिखा पांडे.

राखीव खेळाडू : शभिनेनी मेघना, स्नेह राणा आणि मेघा सिंग