आयपीएलच्या 17 व्या हंगामात प्लेऑफसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामातील अंतिम सामना हा 26 मे रोजी पार पडणार आहे. त्यानंतर सर्वच क्रिकेट विश्वाचं लक्ष हे आयसीसी मेन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कडे असणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलंय. अशात दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे आणि टी 20 मालिकेसह एकमेव कसोटी सामन्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. आगामी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी उभयसंघांसाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. बांगलादेशमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात उभयसंघात एकदिवसीय, कसोटी आणि टी 20 मालिका होणार आहे. उभयसंघातील या तिन्ही मालिकांचं आयोजन हे 16 जून ते 9 जुलै दरम्यान करण्यात आलं आहे. उभयसंघात 3 वनडे, 3 टी 20 आणि एक कसोटी सामना होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने हे बंगळुरुत होणार आहेत. त्यानंतर एकमेव कसोटी सामना टी 20 मालिकेचं चेन्नईत आयोजन करण्यात आलं आहे.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना, 16 जून, दुपारी दीड वाजता, बंगळुरु
दुसरा सामना, 19 जून, दुपारी दीड वाजता, बंगळुरु
तिसरा सामना, 23 जून, दुपारी दीड वाजता, बंगळुरु
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
🚨 NEWS 🚨
Fixtures for @IDFCFIRSTBank South Africa Women’s all-format tour of India announced.
Details 🔽 #TeamIndia
— BCCI Women (@BCCIWomen) May 14, 2024
28 जून ते 1 जुलै, सकाळी साडे नऊ वाजता, चेन्नई
पहिला सामना, शुक्रवार 5 जुलै, चेन्नई, संध्याकाळी 7 वाजता
दुसरा सामना, रविवार 7 जुलै, चेन्नई, संध्याकाळी 7 वाजता
तिसरा सामना, मंगळवार 9 जुलै, चेन्नई, संध्याकाळी 7 वाजता