मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा टप्पा सुरु आहे. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांनी सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. तसेच श्रीलंकेवर विजय मिळवून न्यूझीलंडनेही जवळपास उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलंय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसाठीही सेमी फायनलची संधी आहे. मात्र त्यासाठी दोन्ही संघांना चमत्कार करावा लागणार आहे, जे जवळपास अशक्य आहे. या सर्व गडबडीत बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने इंग्लंड आणि बांगलादेश विरुद्धच्या चौकोनी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. तसेच वेळापत्रकही प्रसिद्ध केलंय. बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने अंडर 19 वनडे चौकोनी सीरिजसाठी टीम इंडियाच्या 2 संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत टीम इंडिया ए-बी, बांगलादेश आणि इंग्लंड असे 4 संघ भिडणार आहेत. तसेच अंतिम सामना आणि तिसऱ्या स्थानासाठीचा सामना हा एकाच दिवशी 27 नोव्हेंबरला होणार आहे. टीम इंडिया अंडर 19 ए आणि अंडर 19 बी असे 2 संघ आहेत. ए टीमची कॅप्टन्सीची जबाबदारी ही सौमी कुमार याच्याकडे आहे. तर बी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या किरण चोरमाले याच्याकडे असणार आहे.
या चौकोनी एकदिवसीय मालिकेचं आयोजन हे 13 ते 27 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. या मालिकेतील सर्व सामने हे विजयवाडा येथे आयोजित करण्यात आले आहेत. आपण या मालिकेचं वेळापत्रक जाणून घेऊयात. या स्पर्धेतील साखळी सामने हे 1 दिवसाने होणार आहेत.
🚨 NEWS 🚨
Squads and fixtures for U19 Men’s Quadrangular Series announced.
Details 🔽https://t.co/yzHvWmaEqP pic.twitter.com/ViMikeFDia
— BCCI (@BCCI) November 9, 2023
13 नोव्हेंबर, टीम इंडिया ए विरुद्ध बांगलादेश.
टीम इंडिया बी विरुद्ध इंग्लंड.
15 नोव्हेंबर, टीम इंडिया बी विरुद्ध बांगलादेश.
टीम इंडिया ए विरुद्ध इंग्लंड.
17 नोव्हेंबर, टीम इंडिया ए विरुद्ध टीम इंडिया बी.
इंग्लंड विरुद्ध बांगलादेश.
20 नोव्हेंबर, टीम इंडिया बी विरुद्ध इंग्लंड.
टीम इंडिया ए विरुद्ध बांगलादेश.
22 नोव्हेंबर, टीम इंडिया ए विरुद्ध इंग्लंड.
टीम इंडिया बी विरुद्ध बांगलादेश.
24 नोव्हेंबर, इंग्लंड विरुद्ध बांगलादेश.
टीम इंडिया ए विरुद्ध टीम इंडिया बी
27 नोव्हेंबर, महाअंतिम सामना आणि तिसऱ्या स्थानासाठी सामना.