मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील उर्वरित 2 कसोटी सामन्यांसाठी आणि वनडे सीरिजसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या कसोटीत पराभव केल्याच्या अवघ्या काही तासांमध्येच बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने याआधी फक्त पहिल्या 2 कसोटींसाठीच भारतीय संघाची घोषणा केली होती. केएल राहुल याच्या फ्लॉप कामगिरीनंतरही निवड समितीने केएल राहुल याच्यावर विश्वास दाखवत संधी दिली आहे.
उभयंसघांमध्ये 2 कसोटी सामन्यानंतर 3 सामन्यांची वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे रोहितऐवजी हार्दिक पंड्या टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याचं एकदिवसीय संघात तब्बल 1 दशकानंतर कमबॅक झालंय. जयेदव याची 2013 नंतर पहिल्यांदा निवड करण्यात आली आहे.
तसेच त्याला पुन्हा कसोटी संघात स्थान दिलंय. जयदेव याला रणजी ट्रॉफी फायनलसाठी बीसीसीआयने दुसऱ्या टेस्टआधी रिलीज केलं होतं.
सौराष्ट्रकडून खेळताना जयदेव याने फायनलमध्ये बंगाल विरुद्ध 6 विकेट्स घेतल्या. जयदेवने टीमला चॅम्पियन करण्यात योगदान दिलं. तसेच 3 महिन्यांआधी जयदेव याने आपल्या नेतृत्वात सौराष्ट्रला विजय हजारे ट्रॉफी जिंकून दिली होती.
जयदेव व्यतिरिक्त टीम इंडियात रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि अक्षर पटेल या चौकडीचंही कमबॅक झालं आहे. अय्यर आणि जडेजा दुखापतीमुळे टीममधून बाहेर होता. तर केएल आणि अक्षर या दोघांनी विवाहासाठी विश्रांती घेतली होती.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
????: Mr Rohit Sharma will be unavailable for the first ODI due to family commitments and Mr Hardik Pandya will lead the side in the first ODI.
— BCCI (@BCCI) February 19, 2023
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, इंदूर
चौथी कसोटी, 9-13 मार्च,
पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई
दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम
तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई
या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.