मुंबई | काही दिवसांपूर्वीच आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा पार पडली. टीम इंडियाचा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव झाला. टीम इंडियाचं विश्व विजेता होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. त्यानंतर आता पुन्हा 2 महिन्यांनी आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ खेळणार आहेत. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने या वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही पंजाबच्या उदय सहारन याच्याकडे दिली आहे. तसेच सोम्य कुमार पांडे हा उपकर्णधार असणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये पुण्याच्या अर्शिन कुलकर्णी आणि बीडच्या सचिन धस या मराठमोळ्या वांघाची निवड करण्यात आली आहे. तर मुंबईच्या मुशीर खान यालाही संधी देण्यात आली आहे.
आयसीसीने या अंडर 19 वर्ल्ड कपचं सोमवारी 11 डिसेंबर रोजी वेळापत्रक जाहीर केलं. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद हे दक्षिण आफ्रिकेकडे आहे. या स्पर्धेतील एकूण 16 संघांना 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. त्यानुसार टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या ए ग्रुपमध्ये बांगलादेश आयर्लंड आणि अमेरिका आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे ब्लोमफोटेंनमध्ये करण्यात आलं आहे.
अंडर 19 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा
🚨 NEWS 🚨: India U19 squad for tri-series in South Africa & ICC Men’s U19 World Cup announced. #U19WorldCup
More Details 👇https://t.co/Xf893sue1S
— BCCI (@BCCI) December 12, 2023
बी ग्रुप : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड.
सी ग्रुप : ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिंबाब्वे आणि नामिबिया.
डी ग्रुप : अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 जानेवारी.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, 25 जानेवारी.
टीम इंडिया विरुद्ध यूएसए, 28 जानेवारी.
अंडर 19 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडिया | उदय सहारन (कर्णधार), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, अरवेल्ली अवनीश राव (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी आणि नमन तिवारी.