IND vs ENG | पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, एकाची एन्ट्री तर दुसरा बाहेर

| Updated on: Feb 29, 2024 | 3:08 PM

India vs England 5th Test | टीम इंडिया 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. आता बीसीसीआयने 5 व्या सामन्यसााठी पुन्हा एकदा घोषणा केली आहे.

IND vs ENG | पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, एकाची एन्ट्री तर दुसरा बाहेर
Follow us on

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना हा 7 मार्चपासून हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी बीसीसीआय निवड समितीने टीम इंडियाचा अपडेटेड स्क्वाड जाहीर केला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियात उपकर्णधार जसप्रीत बुमराह याचं कमबॅक झालं आहे. बुमराहला इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी वर्कलोड मॅनेजमेंटनुसार विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर आता पाचव्या सामन्यासाठी बुमराहची एन्ट्री झाली आहे. तर दुखापतीमुळे केएल राहुल बाहेर झाला आहे. केएल राहुल याचा टीम इंडिया अखेरच्या 3 सामन्यांसाठी फिटनेसच्या निकषावर समावेश करण्यात आला होता. मात्र केएल आता दुखापतीवर उपचारांसाठी लंडनला गेल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. केएलकडे बीसीसीआयची मेडीकल टीम लक्ष ठेवून असल्याचंही बीसीसीआयने सांगितंल आहे.

हे सुद्धा वाचा

तसेच बीसीसीआयने ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला रिलीज केलं आहे. सध्या रणजी ट्रॉफीतील बाद फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. वॉशिंग्टन तामिळनाडू टीमसोबत जोडला जाणार असल्याचंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. रणजी ट्रॉफीतील दुसरा उंपात्य फेरीतील सामना हा 2 मार्चपासून मुंबईतील बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमीत आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात मुंबई विरुद्ध तामिळनाडू यांच्यात फायनलसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

पाचव्या टेस्टसाठी अपडेटेड टीम इंडिया


पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.

टेस्ट सीरजसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, डॅनियल लॉरेन्स आणि गेस ऍटकिन्सन.