आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, दोन खेळाडू बाहेर, कॅप्टन कोण?

| Updated on: Jul 07, 2024 | 3:49 PM

Bcci Annouced team india : टी-२० वर्ल्ड कप पार पडल्यानंतर आशिया कपसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. अवघे काही दिवस बाकी असून भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत.

आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, दोन खेळाडू बाहेर, कॅप्टन कोण?
Follow us on

टी-20 वर्ल्ड कपवर मेन्स टीम इंडियाने नाव कोरत इतिहास रचला. फायनलनमध्ये टीम इंडियाने साऊथ आफ्रिका संघाचा पराभव केलेला. टीम इंडियाने वर्ल्ड कपवर जिंकल्यावर भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने निवृत्ती जाहीर केली. आती बीसीसीआयसमोर संघबांधणीसाठीचं मोठं आव्हान असणार आहे. अशातची येत्या 19 जुलैपासून वुमन्स आशिया कपला सुरूवात होणार आहे. आगामी आशिया कपसाठी वुमन्स टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया कपसाठी जाहीर झालेल्या संघामध्ये 15 खेळाडूंचा समावेश असून चार खेळाडूंना राखीव ठेवण्यात आलं आहे.

आता वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स साऊथ आफ्रिकेविरूद्ध टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना टीममध्ये जागा देण्यात आलीये. रिचा घोष आणि उमा छेत्री यांना संघात यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली आहे. त्याचबरोबर शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज या महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश आहे. अमनजोत कौर आणि शबनम शकील यांना टीममध्ये जागा मिळाली नाही. श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंग यांचा भारतीय संघात राखीव खेळाडू ठेवण्यात आलं आहे.

आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी 19 जुलैला एकमेकांविरोधात भिडणार आहेत. टीम इंडिया अ गटात असून पहिलाच सामना पाकिस्तानसोबत असणार आहे. त्यानंतर 21 जुलैला संयुक्त अरब अमिराती आणि 23 जुलैला नेपाळविरुद्ध टीम इंडिया खेळणार आहे. सर्व सामने रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. वुमन्स टीम इंडियाने सात वेळा आशिया कपवर नाव कोरलं आहे.

आशिया कपसाठी वुमन्स टीम इंडिया:-

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना. , राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजना सजीवन. राखीव: श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंग.