ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट हवंय का? जाणून घ्या कसं आणि कुठे मिळेल ते

| Updated on: Sep 06, 2023 | 9:43 PM

BCCI On One Day World Cup 2023 छ वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी पात्र ठरलेल्या दहा संघांच्या खेळाडूंची घोषणाही झाली आहे. मात्र सामन्यांचं तिकीट कधी मिळणार याबाबत प्रश्न विचारले जात होते. याबाबत बीसीसीआयने घोषणा केली आहे.

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट हवंय का? जाणून घ्या कसं आणि कुठे मिळेल ते
ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटांबाबत बीसीसीआयकडून मोठी घोषणा, जाणून कुठे आणि कसं मिळेल ते
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा भारतात होत असून यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. काही सामन्याचं वेळापत्रकही मधल्या काळात बदलण्यात आलं आहे. या वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमी प्रचंड उत्सुक आहेत. खासकरून भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहता यावा यासाठी धडपड सुरु असते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सामन्यांसाठीची तिकीट विक्री कधी सुरु होईल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ही प्रतिक्षा संपली असून बीसीसीआयने अधिकृतरित्या याबाबत घोषणा केला आहे. स्पर्धेत सहभागी असलेल्या संघ व्यवस्थापनाशी बोलून तिकीट विक्रीबाबत माहिती दिली आहे. जवळपास 4 लाख तिकिटं विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. पण ही तिकीटं कधी मिळणार? आणि त्यासाठी कशी प्रक्रिया असेल याबाबत जाणून घ्या.

अशी मिळतील वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी तिकीटं

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या सर्व सामन्यांच्या तिकिटांची विक्री 8 सप्टेंबरपासून रात्री 8 वाजल्यापासून होणार आहे. क्रीडाप्रेमी https://tickets.cricketworldcup.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करू शकता. वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होमआर आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. हा सामना चेन्नईत असणार आहे. त्याचबोरब 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे.

बीसीसीआयने ट्वीटमध्ये काय दिली माहिती?

बीसीसीआने ट्वीट केलेल्या माहितीत सांगितलं आहे की, “जगभरातील क्रीडाप्रेमी यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित करू शकतात. 8 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता तिकीट विक्री सुरु होईल.”

वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचं वेळापत्रक

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर 2023, दुपारी 2 वाजता
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर 2023, दुपारी 2 वाजता
  • भारत विरुद्ध पाकिस्तान, 14 ऑक्टोबर 2023, दुपारी 2 वाजता
  • भारत विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर 2023, दुपारी 2 वाजता
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर 2023, दुपारी 2 वाजता
  • भारत विरुद्ध इंग्लंड, 29 ऑक्टोबर 2023, दुपारी 2 वाजता
  • भारत विरुद्ध श्रीलंका, 2 नोव्हेंबर 2023, दुपारी 2 वाजता
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर 2023, दुपारी 2 वाजता
  • भारत विरुद्ध नेदरलँड, 12 नोव्हेंबर 2023, दुपारी 2 वाजता