BCCI ने हेड कोचबाबत केली मोठी घोषणा, ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली जबाबदारी

| Updated on: Nov 29, 2023 | 3:58 PM

Team India Head Coach : गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा होत होती. बीसीसीआय कोणाची निवड करणार याकडे क्रिकेट चाहत्यांंचंही लक्ष लागून होतं. आता चाहत्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

BCCI ने हेड कोचबाबत केली मोठी घोषणा, या दिग्गज खेळाडूकडे सोपवली जबाबदारी
team india
Follow us on

मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली असून बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. वर्ल्ड कप फालनलनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाल संपला होता. त्यानंतर प्रशिक्षकपदासाठी कोणची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. बीसीसीआयने परत एकदा मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा राहुल द्रविडकडे दिली आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

बीसीसीआयने केलेलं ट्विट-:

 

बीसीसीआयने राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफचाही करार वाढवला आहे. बीसीसीआय आणि राहुल द्रविड यांच्याच चर्चा झाली त्यानंतर कार्यकाळ वाढवण्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयने आशिष नेहरा याला टी-२० साठी हेड कोच म्हणून ऑफर केल्याची बातमी आली होती. मात्र नेहराने नकार दिल्याची माहिती समजत आहे. आशिष नेहराच्या नकारानंतर राहुल द्रविड याला बीसीसीआयने कायम केलं आहे. येत्या टी-२० वर्ल्ड कपसाठी आता संघ बांधणी करावी लागणार आहे.

2024 मध्ये टी-20 वर्ल्ड कपचं यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडे आहे. यंदाच्या वर्ल्ड कपचं  स्वप्नभंग झाल्यावर भारतीय चाहत्यांना टी-20 वर्ल्ड कपच्या आशा आहेत. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिका सुरू आहे त्यामध्ये जात असताना व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे. आता 10 फेब्रुवारीला भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल त्यावेळी राहुल द्रविड पुन्हा आपली जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे.

भारताने चॅम्पियन ट्रॉफीनंतर एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. अनेकदा हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्यासारखं झालं आहे. त्यामुळे रोहितचं नेतृत्त्व आणि कोच म्हणून द्रविड यांच्या कारकिर्दीत वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली जाते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.