Bcci | बीसीसीआयमध्ये मुकेश अंबानी यांची एन्ट्री, खोऱ्याने कमाई करणार

| Updated on: Aug 31, 2023 | 8:24 PM

Bcci Media Rights 2023 | आशिया कप स्पर्धेचा थरार एका बाजूला सुरु असताना क्रीडा विश्वातून मोठी बातमी आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत मुकेश अंबानी यांच्या एन्ट्रीबाबतची माहिती दिली आहे.

Bcci | बीसीसीआयमध्ये मुकेश अंबानी यांची एन्ट्री, खोऱ्याने कमाई करणार
Follow us on

मुंबई | क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय नियमाक क्रिकेट मंडळात मुकेश अंबानी यांची एन्ट्री झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या वायकॉम 18 ग्रुपला पुढील 5 वर्षांसाठी भारतात होणाऱ्या द्विपक्षीय सामन्यांसाठी मीडिया राईट्स मिळाले आहेत. बीसीसीआयने मीडिया राईट्स देण्यासाठी लिलाव आयोजित केलं होतं. बीसीसीआयचे मीडिया राईट्स मिळवण्यासाठी वायकॉम 18 ग्रुप, डिजनी स्टार आणि सोनी पिक्चर्स यांच्यात कडवी झुंज होती. मात्र अखेर अंबांनी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वायकॉम 18 ग्रुपने बाजी मारत मीडिया राईट्स मिळवले आहेत. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विटर करत याबाबतची माहिती दिली आहे.

बीसीसीआयची रग्गड कमाई

वायकॉमकडे आता सप्टेंबर 2023 ते मार्च 2028 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी बीसीसीआय मीडिया राईट्स असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वायकॉम 18 बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी 67 कोटी 80 लाख द्यावे लागणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयचीही मीडिया राईट माध्यमातून तगडी कमाई होणार आहे. टीम इंडिया आशिया कपनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. या मालिकेतून वायकॉम 18 च्या बीसीसीआयसोबतच्या कराराची सुरुवात होणार आहे.

वायकॉम आपल्या 5 वर्षांच्या कालावधीत भारतात 88 आंतरराष्ट्रीय सामने लाईव्ह दाखवणार आहे. या 88 सामन्यांमध्ये 25 टेस्ट, 27 वनडे आणि 36 टी 20 सामन्यांचा समावेश असणार आहे. हे 88 सामने टीव्हीवर स्पोर्ट्स 18 चॅनेलवर पाहता येतील. तर मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओ सिनेमा एपवर मॅच पाहता येईल.

मीडिया राईट्ससह आता वायकॉम 18 कडे असंख्य स्पोर्ट्स इव्हेंटच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. त्यानुसार आयपीएल डीजीटल स्ट्रीमिंग, वूमन्स प्रीमियर लीग टीव्ही आणि डिजीटल स्ट्रिमिंग, दक्षिण आफ्रिका इंडिया टूर, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज, साऊथ आफ्रिका टी 20 सीरिज, एनबीए आणि सीरिज ए च्या प्रसारणाचे अधिकार आहेत.

स्टार स्पोर्ट्सला मोठा धक्का

याआधी भारतात होणाऱ्या टीम इंडियाच्या सर्व सामन्यांचे अधिकार हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे होते. स्टार स्पोर्ट्सकडे सलग 11 वर्ष हे अधिकार होते. मात्र आता वायकॉम 18 ने स्टार स्पोर्ट्सला धक्का देत टीव्ही आणि डीजीटल राईट्स मिळवले आहेत. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या हातातून सर्वच गेलंय, अशातलाही भाग नाही. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पुढील 4 वर्षात आयसीसी स्पर्धाचं प्रसारण करणार आहे.

बीसीसीआयकडून मीडिया राईट्सची घोषणा

जय शाह याचं ट्विट

दरम्यान बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करत वायकॉम 18 ला मीडिया राईट्स मिळाल्याने शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जय शाह यांनी स्टार इंडिया आणि डिज्नी हॉटस्टार यांचेही आभार मानले.