मुंबई : इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने टीमची घोषणा केली आहे. टीम इंडियासाठी मोठा धक्का म्हणजे स्टार बॉलर जसप्रीत बुमराह याल विश्रांती देण्यात आली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या 23 फेब्रुवारीला होणार आहे. टीमसाठी आणखी एक वाईट बातमी म्हणजे के. एल. राहुल अजुनही दुखापतीमधून सावरला नसल्याने तो चौथ्या कसोटी सामन्यालाही मुकणार आहे.
🚨 NEWS 🚨
Jasprit Bumrah released from squad for 4th Test.
Details 🔽 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank https://t.co/0rjEtHJ3rH pic.twitter.com/C5PcZLHhkY
— BCCI (@BCCI) February 20, 2024
टीम इंडियाचा युवा खेळाडू मुकेश कुमार हा संघात परतला आहे. तिसऱ्या सामन्यामधील प्लेइंग 11 मध्ये नसल्याने त्याला रणजी सामना खेळण्यासाठी सोडण्यात आलं होतं. बंगाल आणि बिहारमधील सामन्यात पठ्ठ्याने दहा विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे जसप्रीत बुमराह याच्या जागी मुकेश कुमार प्लेइंग 11 मध्ये खेळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या मालिकेत रोहितसेनेने तिसरा कसोटी सामना जिंकत 2-1 ने आघाडी घेतली आहे. जर चौथा सामनाही टीम इंडियाने जिंकला तर मालिका टीम इंडिया खिशात घालणार आहे. या कसोटी सामन्यात संघामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. बुमराह याच्या जागी मुकेश कुमार की आकाश दीप याला संधी मिळते याकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान असणार आहे. हा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे.
रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.