मुंबई : आयपीएलचं बिगुल वाजलं असून वुमन्स प्रीमियर लीगचं पहिलं पर्व येत्या 4 मार्चपासून सुरू होणार आहे. अशातच वुमन्स आयपीएलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा म्हणून बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समजत आहे. आयपीएल आता फुकट पाहता येणार आहे. विश्वास बसणार नाही पण खरं आहे. महिला आणि मुलींना स्टेडियममध्ये विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे. तर पुरूषांना नाममात्र तिकीटाचा दर ठेवण्यात आला आहे.
वुमन्स आयपीएलचे सर्व सामने मुंबईतील मैदानांवर होणार आहेत. पहिल्या पर्वाचा एक भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये पंजाबी गायक एपी ढिल्लन, बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनन आणि कियारा अडवाणी हे परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत. मुंबई (Mumbai Indians) आणि गुजरात (Gujarat Giants) यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार असून सामन्यांची तिकीटे ‘बुक माय शो’वरही बुक करता येणार आहेत. महिलांना फ्री असून पुरूषांच्या तिकीटांची किंमत 100 ते 400 पर्यंत इतकी ठेवण्यात आली आहे.
A star ⭐ studded line-up
D.Y.Patil Stadium will be set for an evening of glitz and glamour ??
?? ??? ???? the opening ceremony of #TATAWPL
Grab your tickets ? now on https://t.co/c85eyk7GTA pic.twitter.com/2dj4L8USnP
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 1, 2023
आताच मागे काही दिवसांमागे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. वानखेडे स्टेडियमवर जवळपास 35000 प्रेक्षकांची उपस्थिती होती. वुमन्स आयपीएलचे सर्व सामने मुंबईत खेळवण्यात येणार असल्याने प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादासाठी बीसीसीआय असे निर्णय घेताना दिसत आहे. त्यासोबतच मुलींची क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठं पाऊल उचलल्यासारखं आहे.