मुंबई | टीम इंडियाचा कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. रहाणेने टीम इंडियात तब्बल 15 महिन्यांनंतर कमबॅक केलं. टीम इंडिया जून महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीप फायनल खेळणार आहे. या महामुकाबल्यासाठी बीसीसीआयने मंगळवारी भारतीय संघ जाहीर केला. या 15 सदस्यीय संघात बीसीसीआयने अजिंक्य रहाणे याला संधी दिली. त्यामुळे रहाणेचं 15 महिन्यानंतर कमबॅक झालं. रहाणे टीम इंडियाकडून अखेरची टेस्ट मॅच ही जानेवारी 2022 मध्ये खेळला होता. हा सामना दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळवण्यात आला होता.
रहाणे सुरु असलेल्या आयपीएल 16 व्या मोसमातही धमाकेगार कामगिरी करतोय. रहाणेला या कामगिरीच्या जोरावर संघात संधी दिल्याचं म्हटलं जात आहे. रहाणेची अचानक एन्ट्री कशी झाली, याचा खुलासा आता झाला आहे. रहाणेची एन्ट्री ही कर्तुत्वावर नाही, तर वशिल्यावर झाल्याची चर्चा आहे. नक्की सर्व प्रकार काय आहे, ते जाणून घेऊयात.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रहाणेच्या समावेशासाठी बीसीसीआयने धोनीसोबत संपर्क केला होता. रहाणे सध्या आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतोय, त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी घेणं किती फायदेशीर ठरेल, याबाबत बीसीसीआयने धोनीकडे रहाणेबाबत चौकशी केल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला. त्यानंतर रहाणेला संधी देण्यात आलं, असं म्हटलं जात आहे. म्हणजेत रहाणेच्या कामगिरीऐवजी धोनीच्या शब्दांमुळे त्याला संघात स्थान मिळालं का,असा सवाल क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.