माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवड यांना ब्लड कँसर झाला असून त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. मात्र आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने बरोड्यात परतले आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. माजी क्रिकेटपटूंनी मदतीचा हात पुढे केला होता. आता बीसीसीआयने एक पाऊल पुढे येत मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने अंशुमन गायकवाड यांच्यासाठी एक कोटींचा फंड जारी केला आहे. न्यूज एजेंसी एएनआयच्या मते, बीसीसीआयच्या एपेक्स काउंसिल ने सांगितलं की, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी अंशुमन गायकवाड यांना 1 कोटी आर्थिक मदत करण्याचं जारी केलं आहे. इतकंच काय तर जय शाह यांनी अंशुमन गायकवाड यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली आणि परिस्थिती जाणून घेतली.
अंशुमन गायकवाड यांची आर्थिक स्थितीबाबत कळताच कपिल देव यांनी मदतीचा हात पुढे केला होता.आपल्या पेन्शनची रकम कुटुंबियांची सहमती असल्यास घ्यावी अशी विनंती केली होती. तसेच बीसीसीआयने अंशुमन गायकवाड यांना मदत करावी अशी विनंतीही केली होती. एका बातमीनुसार, सुनील गावस्कर, रवि शास्त्री, दिलीप वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, मदनलाल आणि किर्ती आझाद यासारख्या माजी क्रिकेटपटूंनी मदतीसाठी पुढे आले होते. त्यानंतर बीसीसीआयने तात्काळ पुढे येत मदतीचा निर्णय घेतला.
BCCI Secretary Jay Shah instructed BCCI to release Rs 1 crore with immediate effect to provide financial assistance to India’s veteran cricketer Anshuman Gaekwad, who is battling cancer. Shah also spoke to Gaekwad’s family and took stock of the situation and provided assistance:…
— ANI (@ANI) July 14, 2024
अंशुमन गायकवाड 1997 ते 2000 या कालावधीत टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी होते. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. दुसरीकडे, अंशुमन गायकवाड 1975 ते 1987 या कालावधीत टीम इंडियासाठी खेळले. वेस्ट इंडिजविरुद्धच 1974 मध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या दरम्यान त्यांनी भारतासाठी 40 कसोटी आणि 15 वनडे सामने खेळले. कसोटीत 1985 आणि 2 गडी बाद केले. तर वनडे त्यांनी 269 धावा केल्या.