क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय निवड समितीने अखेर श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. टीम इंडिया श्रीलंके विरुद्ध प्रत्येकी 3-3 सामन्यांची टी20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया या दौऱ्याची सुरुवात 27 जुलैपासून टी 20i मालिकेने करणार आहे. बीसीसीआयने रोहित शर्मा याच्या टी20i निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं एकदिवसीय संघात पुनरागमन झालं आहे. रोहित वनडे टीमचा कॅप्टन असणार आहे. तर शुबमन गिल दोन्ही मालिकेत उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
गौतम गंभीर याचा टीम इंडियाचा हेड कोच म्हणून हा पहिलाच दौरा असणार आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर नव्या भूमिकेसाठी सज्ज आहे. गंभीरची काही दिवसांपूर्वीच मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गंभीरने राहुल द्रविड यांची जागा घेतली आहे. द्रविड यांचा कार्यकाळ हा टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर संपला.
टी 20 सीरिज
पहिला सामना, 27 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
दुसरा सामना, 28 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
तिसरा सामना, 30 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 2 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
दुसरा सामना, 4 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
तिसरा सामना, 7 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
उभयसंघातील टी 20 मालिकेतील सामन्यांना संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. हे तिन्ही सामने पल्लेकेले येथे आयोजित करण्यात आले आहेत. तर एकदिवसीय मालिकेतील सामन्यांची सुरुवात ही दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हे कोलंबो येथे आयोजित करण्यात आले आहेत.
Captain appointed 🚨
India will be led by a new T20I skipper on their tour of Sri Lanka 👊https://t.co/nWoiDNOWjD
— ICC (@ICC) July 18, 2024
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.