मुंबई : भारतीय क्रिकेटसाठी गेली काही वर्ष चांगली गेलेली नाहीत. अशातच फेब्रुवारी महिन्यात एका स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांनी भारतीय संघाच्या चीफ सिलेक्टर पदाचा राजीनामा दिला होता. चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर चीफ सिलेक्टर पद रिकामं झालं असून सध्या शिवसुंदर दास हे चीफ सिलेक्टरची भूमिका बजावत आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड नव्या चीफ सिलेक्टरच्या शोधात असून रोज नवनवीन नावे समोर येत आहे.
भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड (BCCI) ने उत्तर भारतातून भारतीय क्रिकेट टीमसाठी सिलेक्टर पदाचे अर्ज मागवले आहे. या भागातून ज्याची निवड होईल, त्याची चीफ सिलेक्टर पदावर वर्णी लागू शकते. या भागातून क्रिकेट विश्व गाजवणारे गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, आणि युवराज सिंह हे खेळाडू येतात.
या खेळाडूंमधील वीरेंद्र सेहवाग सोडून कोणीही या पदासाठी योग्य नसल्याने सेहवागच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डने वीरेंद्र सेहवागला या पदासाठी ऑफर दिल्याचं बोललं जात आहे. मात्र वीरेंद्र सेहवागने स्वतः यावर खुलासा करत अशी कोणतीही ऑफर आली नसल्याचं सांगितलं आहे.
असा खेळाडू ज्याने 30 फर्स्ट क्लास मॅच खेळले आहेत. ज्या खेळाडूने 7 पेक्षा जास्त टेस्ट मॅच खेळले आहेत. 10 वनडे मॅच किंवा 5 वर्षांआधी निवृत्त झालेला आहे. BCCI च्या कोणत्याही कमेटीची सदस्य नसला पाहिजे. चीफ सिलेक्टर झाल्यावर 5 वर्ष पदावर कार्यरत राहण्याची तयारी असावी.
भारतीय क्रिकेट संघाच्या चीफ सिलेक्टरला वर्षाला 1 कोटी रुपये इतके मानधन मिळतं. तर चीफ सिलेक्टर कमिटीतील इतर 4 सदस्यांना 90 लाख रुपये मानधन मिळतं. सध्या निवड समितीत 4 सदस्य आहेत. शिव सुंदर दास (ईस्ट), सुब्रतो बॅनर्जी (मध्य), सलिल अंकोला (पश्चिम) आणि एस शरथ (दक्षिण) हे 4 सदस्य सध्या समितीत आहेत. शिव सुंदर दास सध्या चीफ सिलेक्टरच्या भूमिकेत आहेत.
वीरेंद्र सेहवागने 104 टेस्ट मध्ये 8586 धावा केल्या असून त्यामध्ये 23 शतकांचा समावेश आहे. सेहवागचा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्कोर 319 रन इतका आहे. सेहवागने 251 वनडे मॅच खेळले आहेत. ज्यात 8273 रन त्याच्या नावावर असून 15 शतकं आणि 38 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.