बीसीसीआय आता रग्बी लीगमध्ये आजमावणार नशीब? अमेरिकेतील बैठकीनंतर सोशल मीडियावर चर्चा

| Updated on: Jun 11, 2024 | 3:51 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धा अमेरिकेत सुरु आहे. साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले असून सुपर 8 फेरीसाठी चुरस वाढली आहे. असं असताना बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एनएफएल मुख्यालयाला भेट दिल्याने वेगळ्याच चर्चांना उधाणआलं आहे. भारतात रग्बीसाठी येत्या काही दिवसात प्रयत्न होताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको.

बीसीसीआय आता रग्बी लीगमध्ये आजमावणार नशीब? अमेरिकेतील बैठकीनंतर सोशल मीडियावर चर्चा
Image Credit source: video grab
Follow us on

भारतात क्रिकेटशिवाय दुसऱ्या कोणत्याच खेळाला हवं तसं प्राधान्य मिळालेलं नाही. क्रिकेटशिवाय दुसरा खेळ कळतंच नाही असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. फुटबॉलमध्ये जगभरातील देश असूनही भारताची कामगिरी सुमार आहे. फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वच स्तरातून आता प्रयत्न होत आहेत. तर इतर खेळांचं खूपच दूर आहे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असूनही हवं तसं व्यासपीठ मिळताना दिसत नाही. असं सर्व चित्र असताना इंडियन प्रीमियर लीगचा संपूर्ण जगभरात बोलबाला आहे. जगातील सर्वात श्रीमंत लीगपैकी एक आहे. त्यामुळे भारतातील क्रिकेट प्रेम यातूनच अधोरेखित होतं. एकट्या भारतात प्रतिभावंत क्रिकेटपटूंची फळी आहे. एकाच वेळी 100 संघ तयार करण्याची ताकद भारतात आहे. आता या भारतात रग्बी लीग दिसली तर आश्चर्य वाटायला नको. हहे काय आम्ही सांगत नाहीत. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओनंतर या चर्चांना उधाण आलं. नेटकऱ्यांनी आपआपल्या परीने त्याचा अर्थ लावण्यास सुरुवात केली आहे. भारतात रग्बी खेळली जाईल वगैरे वगैरे..मात्र याबाबत भविष्यातच काय ती स्पष्टता येईल. त्यामुळे सध्यातरी या फक्त चर्चा आहेत.

जगातील दहा प्रसिद्ध खेळांमध्ये रग्बीचा नंबर येतो. अमेरिकेत रग्बी खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे अमेरिकेत क्रिकेट रुजत असताना भारतातही रग्बीची मूळं रोवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचं बोललं जात आहे. बीसीसीआयने व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे की, “जेव्हा जगातील दोन सर्वात मोठ्या क्रीडा लीग एकत्र येतात! बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एनएफएल मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यानी कमिश्नर रॉजर गुडेल आणि त्यांच्या प्रतिष्ठित टीमशी चर्चा केली. या बैठक सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, कल्पनांची देवाणघेवाण आणि चाहत्यांची गुंतवणुक आणि अनुभव वाढवण्यावर केंद्रित होती.”

यावेळी दोन्ही मंडळांनी एकमेकांना खेळाचं साहित्य देत सन्मान केला. या बैठकीतून नेमकं काय पुढे येतं हे येणारी वेळच सांगेल. मात्र सध्या तरी या भेटीवरून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. रग्बी खेळाचे भारतातही अनेक चाहते आहेत. या खेळाबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. हातात बॉल पकडून धावताना प्रतिस्पर्धी खेळाडूंचा घेराव फोडण्याचं मोठं आव्हान असतं. दरम्यान, इंडियन रग्बी फुटबॉल युनियनने भारतात रग्बी प्रीमियर लीग सुरु करण्यासाठी पावलं उचलली आहेत. ही लीग स्पर्धा 7S फॉर्मेटमध्ये सप्टेंबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी सहा संघ सहभागी होतील.