मुंबई | आशिया कप 2023 चं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने श्रीलंका आणि पाकिस्तान इथे करण्यात आलंय. ही स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण 13 सामने होणार आहेत. त्यापैकी 4 सामने हे पाकिस्तान आणि 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने हे वनडे फॉर्मेटनुसार पार पडणार आहेत. यंदा आशिया कपसाठी नेपाळ क्रिकेट टीमनेही क्वालिफाय केलंय. त्यामुळे यंदा एका ट्रॉफीसाठी टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बागंलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे 6 संघ भिडणार आहेत. टीम इंडियाच्या नावावर सर्वाधिक आशिया कप जिंकण्याच्या विक्रम आहे. तर श्रीलंका याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काऊन्सिलने काही दिवसांपूर्वीच आशिया कपचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. आता क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार, याचे वेध लागले आहेत. टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार, याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवड समिती सोमवार 8 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.
आशिया कप 2023 प्रोमो
Promo for Asia Cup 2023 ?pic.twitter.com/2G3K4OG7He
— Johns. (@CricCrazyJohns) August 3, 2023