सूर्यकुमार यादवने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला कर्णधार म्हणून पहिल्याच टी20i मालिकेत क्लिन स्वीपने विजय मिळवून दिला. टीम इंडियाने श्रीलंकेचा 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला.मात्र सूर्यकुमार यादव वनडे आणि टेस्ट टीममध्ये आपलं स्थान निर्माण करता आलेलं नाही. मात्र सूर्यकुमार वनडे आणि टेस्टमध्ये कमबॅक करण्याची सज्ज झाला आहे. सूर्यकुमार आगामी बूची बाबू आणि दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आता कसोटी संघात परतण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यानंतर सध्या विश्रांतीवर आहे. या दरम्यान टीम इंडियाचे खेळाडू हे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहेत. तसेच त्यानंतर बांगलादेश आणि न्यूझीलंड टीम कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया-बांगलादेश कसोटी मालिका सप्टेंबरमध्ये तर न्यूझीलंड विरूद्धच्या टेस्ट सीरिजला ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
सूर्यकुमार बूची बाबू स्पर्धेत सरफराज खान याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तसेच सूर्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ऋतुराज गायकवाड याच्या कॅप्टन्सीत खेळणार आहे. बूची बाबू स्पर्धेला 15 ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. तर अंतिम सामना हा 8 सप्टेंबरला होईल. तर दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. सूर्यासाठी या दोन्ही स्पर्धा संधी आणि आव्हान अशा दुहेरी स्वरुपाच्या असणार आहेत. सूर्याला या स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करण्याचं आव्हान असेल. तर आपण टी 20iसह वनडे आणि टेस्ट टीमसाठीही योग्य आहोत, हे देखील दाखवून देण्याची संधी सूर्याकडे आहे. सूर्याने 2023 मध्ये कसोटी पदार्पण केलं. सूर्याला टेस्ट डेब्यूत फक्त 8 धावाच करता आल्या. त्यानंतर सूर्याला कसोटी संघात संधी मिळाली नाही.
दरम्यान सूर्यकुमार यादव याने टीम इंडियाचं 1 कसोटी आणि 37 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. सूर्याने एकमेव कसोटी सामन्यात 8 धावा केल्या आहेत. तर सूर्याने 37 वनडे मॅचेसमध्ये सूर्याने 773 रन्स केल्या आहेत. तर सूर्याच्या नावावर टी20i क्रिकेटमधील 71 सामन्यांमध्ये 2 हजार 432 धावांची नोंद आहे.