Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी गूडन्युज, थेट बीसीसीआयकडून बोलावणं

| Updated on: Jun 14, 2023 | 9:07 PM

Arjun Tendulkar Bcci | गोवाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकर याला लॉटरी लागली आहे.

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी गूडन्युज, थेट बीसीसीआयकडून बोलावणं
Follow us on

मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा आणि मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. अर्जुनची आयपीएल पदार्पणानंतर सिनिअर टीम इंडियात पदार्पणाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. बीसीसीआयने अर्जुलनला बोलावणं पाठवलंय. बीसीसीआयने अर्जुनला बंगळुरुतील एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट एकेडमीसाठी बोलावणं धाडलंय. बीसीसीआयने अर्जुनसह एकूण 20 प्रतिभावान खेळाडूंना एनसीए कँपसाठी बोलावलंय.

बीसीसीआय एलीट स्तरावर हरहुन्नरी खेळाडूंचा शोध घेत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने 20 खेळाडूंना एनसीएमध्ये बोलावलंय. एनसीएत एकूण 3 आठवड्यांचा हा कँप असणार आहे. “वर्षाच्या शेवटी अंडर 23 आशिया कप स्पर्धेंच आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी बीसीसीआय युवा खेळाडूंचा शोध घेत आहे. ऑलराउंडर खेळाडूंचा कँप घेण्याची संकल्पना ही एनसीए हेड व्हीव्हीएस लक्ष्मण यांची आहे. ज्यामुळे वनडे, टेस्ट आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटसाठी खेळाडूंचा शोध घेता येईल”, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

अर्जुनसोबत आणखी कोण कोण?

मिळाळेल्या माहितीनुसार, अर्जुनसोबत या कॅम्पमध्ये चेतन साकरिया, अभिषेक शर्मा, मोहित रेडकर, हर्षित राणा, मानव सुतार, दिविज मेहरा आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे.

टीम इंडियाचा विंडिज दौरा

दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर आता जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्यावर जाणार आहे. वेस्टइंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी 20 सामन्यांच्या एकूण 3 मालिका खेळवण्यात येणार आहेत. निवड समिती या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देणार असल्याचं समजतंय. यामध्ये रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि इतर खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया टेस्ट, वनडे आणि टी 20 मालिकेचं वेळापत्रक

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – 12 ते 16 जुलै, डोमिनिका.

दुसरा सामना – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 27 जुलै, बारबाडोस.

दूसरा सामना, 29 जुलै, बारबाडोस.

तिसरा सामना – 1 ऑगस्ट, त्रिनिदाद.