INDvsAUS | अजिंक्य रहाणे याला निवड समितीने पुन्हा डावललं, ऑस्ट्रेलिया विरुद्ध संधी नाहीच

| Updated on: Feb 19, 2023 | 9:25 PM

अजिंक्य रहाणे याची निवड समितीकडून पुन्हा निराशा झाली आहे. निवड समितीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित 2 कसोटी सामन्यांसाठी अजिंक्यला पुन्हा डच्चू दिला आहे.

INDvsAUS | अजिंक्य रहाणे याला निवड समितीने पुन्हा डावललं, ऑस्ट्रेलिया विरुद्ध संधी नाहीच
फोटो सौजन्य | पीटीआय
Follow us on

मुंबई : बीसीसीआय निवड समिती मुंबईकर अजिंक्य रहाणे याच्याकडे सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतेय का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय, त्याचं कारणही तसंच आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित 2 कसोटी आणि वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. यामध्ये निवड समितीने केलेला प्रताप पाहून तुमच्याही तळपायाची आग डोक्यात जाईल.

निवड समितीने अपयशी ठरत असलेल्या केएल राहुल याला पुन्हा संधी दिलीय. तर संधीच्या प्रतिक्षेत असलेल्या अजिंक्य रहाणे आणि सरफराज खान यांच्याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे सोशल मीडियावर अजिंक्य आणि सरफराज या दोघांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

केएल याला संधी का?

अजिंक्य याला संधी न मिळाल्याने त्याचे चाहते संतप्त झाले आहेत. केएल गेल्या अनेक सामन्यांपासून सातत्याने सपशेल अपयशी ठरतोय. केएलला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. मात्र केएलचा फॉर्म हा कॅप्टन रोहितसाठी आणि पूर्ण टीमसाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय. त्यामुळेच केएल याला उर्वरित सामन्यांमध्ये संधी न देता अजिंक्यला खेळवावं, अशी मागणी नेटकऱ्यांची होती. पण तसं झालं नाही.

केएल अपयशी

केएल दुसऱ्या टेस्टमध्येही फ्लॉप ठरला. केएलने पहिल्या डावात 17 तर दुसऱ्या डावात फक्त 1 धावच केली. केएलने गेल्या 10 टेस्ट इनिंग्समध्ये एकदाही 25 रन्स करु शकलेला नाही. केएलने गेल्या 10 डावांमध्ये फक्त 125 धावा केल्या आहेत. केएलचा यात 23 हा बेस्ट स्कोअर आहे.

अंजिक्य एकेवेळी टीम इंडियाचा कर्णधार राहिलाय. मात्र आता तो टीममधून बाहेर आहे. अजिंक्य अखेरचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध जानेवारी 2022 मध्ये खेळला होता.

अजिंक्यने त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत कामगिरीने आपली छाप सोडली. यासह अजिंक्यने उर्वरित 2 सामन्यांसाठी आपली दावेदारी ठोकली होती. पण निवड समितीने अखेर अजिंक्यवर अविश्वासच दाखवला.

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा मध्य प्रदेश इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

उर्वरित 2 कसोटींसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई

दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम

तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई

या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.