मुंबई : भारत आणि ऑस्ट्रिलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना काही दिवसांवर आला आहे. या फायनल सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा कायम आहे. तर मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याने संघांमध्ये पुन्हा कमबॅक केलं आहे. आयपीएलमध्ये केलेल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर रहाणेने संघात स्थान मिळवलं आहे. अशातच बीसीसीयआने संघामध्ये आणखी काही बदल केला आहे.
बीसीसीआयने गुरूवारी घोषणा केली असून संघामध्ये आणखी काही खेळाडूंचा समावेश केला आहे. नव्य दमाच्या खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. BCCI निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी ऋतुराज गायकवाड, सर्फराज खान आणि इशान किशन, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांना यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून घोषित केलं आहे.
फायनल सामना खेळण्याआधी बीसीसीआयने एक खास प्लॅन बनवला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी रवा सामना झाला पाहिजे, याबाबत विचार सुरू आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, प्रशिक्षक कर्मचारी आणि आयपीएल प्लेऑफमधून बाहेर पडलेले खेळाडू 23 मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत.
आयपीएलमध्ये मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे याने जबरदस्त कमबॅक केलं आहे. आयपीएलमध्ये त्याने ज्य प्रकारचं प्रदर्शन केलं आहे ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. एखाद्या युवा फलंदाजासारखी त्याने बहारदार बॅटींग केली. अजिंक्यच्या अनुभवाचा फायदा संघाला होईल या उद्देशानेच बीसीसीआयने त्याला संघात परत घेतलं आहे.
भारताचा WTC फायनल सामन्यासाठी अंतिम संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.