आयपीएलमध्ये आपल्या बॉलिंगच्या वेगाने दिग्गजांना गार करणारा युवा खेळाडू टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या खेळाडूने आपल्या प्रदर्शनाने सर्वांना वेड करून टाकलं होतं. या खेळाडूच्या मागे दुखापत लागल्याने तो आयपीएलमध्ये दुखापती झाल्यानंतर अजुनही क्रिकेटपासून दूर आहे. या खेळाडूच्या निवडीबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अपडेट दिली आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मयंक यादव आहे. आयपीएल 2024 मध्ये 22 वर्षीय मयंक यादव ताशी 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली होती. मयंक 156.7 किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू फेकताना दिसला. मयंकला 2022 च्या लिलावात लखनऊने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना मयंकने आपल्या वेगवान माऱ्याने सर्वांना वेड करून टाकलं होतं. मात्र त्याला अवघे चार सामने खेळून बाहेर पडावं लागलं होतं. मयंक यादवचे सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे.
मी तुम्हाला मयंद यादववर कोणतेही उत्तर देऊ शकत नाही. कारण तो संघात असेल की नाही ठामपणे सांगू शकत नाही. पण तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे आणि आम्ही त्याची काळजी घेत आहोत. तो सध्या एनसीएमध्ये असल्याचं जय शाह यांनी म्हटलं आहे.
टीम इंडियाचा कोच असलेल्या गौतम गंभीर याने आयपीएलमध्ये लखनऊ संघाचा मेंटॉर म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी बॉलिंग कोच मोर्ने मॉर्केल होता. आता गंभीर मुख्य कोच आणि मोर्केल हा बॉलिंग कोच असल्याने मयंक यादव याला संधी मिळते की नाही याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.