IND vs BAN: टीम इंडियासाठी बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेआधी चिंताजनक बातमी!

| Updated on: Aug 20, 2024 | 12:05 AM

Indian Cricket Team: टीम इंडिया सप्टेंबर महिन्यात मायदेशात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठी अपडेट दिली आहे.

IND vs BAN: टीम इंडियासाठी बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेआधी चिंताजनक बातमी!
test team india
Follow us on

टीम इंडिया सध्या विश्रांतीवर आहे. टीम इंडिया आता पुढील आणि कसोटी मालिका ही बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. बांगलादेश या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. उभयसंघात एकूण 2 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेला अद्याप बरेच दिवस आहे. मात्र त्याआधी टीम इंडियासाठी चिंताजनक बातमी आली आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमी याच्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. मोहम्मद शमी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर दुखापतीमुळे टीम इंडियापासून दूर आहे.

मोहम्मद शमी याने आपल्या धारदार बॉलिंगने वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत धमाका केला होता. शमीने अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले. मोहम्मद शमीला मात्र त्यानंतर आयपीएल आणि टी 20 वर्ल्ड स्पर्धेला घोट्याच्या दुखापतीमुळे मुकावं लागलं. टीम इंडिया नुकतीच श्रीलंका दौऱ्यावर जाऊन आली. त्याआधी मोहम्मद शमी बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेपर्यंत फिट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तशी आशाच निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी व्यक्त केली होती. मात्र आता काही मिडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद शमीचं बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेतून नाही, तर न्यूझीलंड विरूद्धच्या टेस्ट सीरिजमधून कमबॅक होईल, असं म्हटलं जात आहे. तसेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शमीबाबत आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेसंबंधी माहिती दिली आहे.

टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळी फेरीतील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही सीरिज आव्हानात्मक असणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत उभयसंघात एकूण 5 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या अव्वल गोलंदांजांना संधी दिली जाईल.

जय शाह काय म्हणाले?

“मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. तसेच शमीबाबतचा निर्णय हा एनसीएच्या रिपोर्टनुसारचा घेतला जाईल”, अस जय शाह म्हणाले.

दरम्यान मोहम्मद शमी सध्या बंगळुरुतील एनसीए अर्थात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे.शमी पूर्णपणे फिट होण्यासाठी एनसीएत मेहनत घेतोय. शमी वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना त्याच्या फिटनेसबाबतची माहिती देतो. मिळालेल्या माहितीनुसार, शमी न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेआधी रणजी ट्रॉफी स्पर्धेतून क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जात आहे.