Jay Shah यांना बीसीसीआयकडून किती वेतन? मिळतात या सुविधा

| Updated on: Jan 31, 2024 | 8:33 PM

Jay Shah Acc Chairman | जय शाह यांची पुन्हा एकदा एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जय शाह हे बीसीसीआय सचिवही आहेत.

Jay Shah यांना बीसीसीआयकडून किती वेतन? मिळतात या सुविधा
Follow us on

मुंबई | बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे सचिव जय शाह यांची एसीसी म्हणजेच आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. इतकंच नाही, तर जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचंही म्हटलं जात आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी जय शाह यांचं नाव आघाडीवर आहे. जय शाह गेल्या 3 वर्षांपासून बीसीसीआयचा सचिव म्हणून कारभार पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात बीसीसीआयमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले.

जय शाह यांनी सचिव म्हणून अनेक निर्णय घेतले. मात्र धक्कादायक बाब अशी की जय शाह यांना बीसीसीआयकडून वेतन मिळत नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना मासिक किंवा वार्षिक असं वेतन मिळत नाही. मात्र अधिकाऱ्यांना इतर सोयी-सुविधा मिळतात. बैठकींना उपस्थिती राहिल्यानंतर, प्रवासासाठी आणि इतर कारणांसाठी अनेक सुविधा मिळतात.

बीसीसीआयची दरवर्षी एजीएम अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडते. बीसीसीआयच्या 2022 सालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना वाढीव खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका असतात. देशातील एका बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अधिकाऱ्यांना 40 हजार रुपये मिळतात. तर परदेशात होणाऱ्या बैठकीसाठी दुप्पट अर्थात 80 हजार रुपये मिळतात.

एसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची फेरनियुक्ती

मानधनाव्यतिरिक्त बीसीसीआयच्या प्रत्येक अधिकाऱ्याला प्रवासासाठी बिजनेस क्लासची तिकीट देण्यात येते. मात्र ही सुविधा फक्त बीसीसीआय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्षसह ठराविक अधिकाऱ्यांनाच आहे. बीसीसीआय अधिकारी इतर क्रिकेट बोर्डांसाठीही कार्यरत असतात. आता जय शाह हे आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. तिथेही त्यांना बैठकांनुसार भत्ता दिला जातो.