नवी दिल्ली | बीसीसीआयने 30 ऑगस्टपासून सुरुवात होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी 9 दिवसांआधी 21 ऑगस्टला भारतीय संघ जाहीर केला आहे. निलड समितीने 17 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा टीमची कॅप्टन्सी करणार आहे. हार्दिक पंड्या हाच उपकर्णधार असणार आहे. वनडे टीममध्ये दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या तिघांची एन्ट्री झाली आहे. तर तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांना संधी दिली आहे. तर संजू सॅमसन याचा टीममध्ये बॅकअप विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे.
तर काही खेळाडूंना निवड समितीने डच्चू दिला आहे. यामध्ये शिखर धवन, युजवेंद्र चहल यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच टीम इंडियाला 2011 मध्ये वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकून देणाऱ्या अनुभवी खेळाडूला वगळलंय. त्यामुळे नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. टीममध्ये आर अश्विन याला संधी दिलेली नाही.
अश्विन अनुभवी फिरकीपटू आहे. तसेच त्याने अनेकदा बॅटिंगनेही टीम इंडियाला जिंकून दिलंय. त्यामुळे अश्विनला ऑलराउंडर म्हटल्यास चूकीचं ठरणार नाही. मात्र बीसीसीआयने अश्विनला संधी न देऊन 4 महिन्यात तीच घोडचूक केलीय.
आर अश्विन याचा जून महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाची काय अवस्था झाली होती, हे सर्व क्रिकेट चाहत्यांनी पाहिलं. टीम इंडियाला त्या महाअंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. अश्विनला संधी न दिल्याने अनेकांनी निवड समितीच्या निर्णयाचा विरोध केला. मात्र त्यानंतरही आता आगामी वर्ल्ड कपच्या तोंडावर अश्विनला आशिया कपमध्ये संधी न दिल्याने हैराणी व्यक्त केली जात आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
स्टँडबाय | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)