IND vs SA | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20-वनडे सीरिजमध्ये रोहित-विराटची निवड का नाही?

| Updated on: Nov 30, 2023 | 10:31 PM

Rohit Sharma And Virat Kohli | रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20 आणि वनडे सीरिजचा भाग नाहीत. या दोघांना बीसीसीआयने संधी न देण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.

IND vs SA | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20-वनडे सीरिजमध्ये रोहित-विराटची निवड का नाही?
Follow us on

मुंबई | टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया टी 20, वनडे आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. यातील टी 20 आणि टेस्ट सीरिज फार महत्त्वाची आहे. कारण अवघ्या काही महिन्यांवर टी 20 वर्ल्ड कप आहे. तर आफ्रिके विरुद्धची कसोटी मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 साखळीचा भाग आहे. मात्र त्यानंतरही निवड समितीने टी 20 आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना संधी दिलेली नाही. त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र या दोघांना टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये संधी का दिली नाही याचं कारणही बीसीसीआयने सांगितलं आहे.

नक्की कारण काय?

आम्हाला टी 20 आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकेतून विश्रांती हवी आहे, अशी विनंती रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी केली होती. त्यानुसार, बीसीसीआयने या दोघांची विनंती स्वीकार करुन त्यांना विश्रांती दिली आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. दरम्यान रोहित आणि विराट दोघेही दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतून कमबॅक करणार आहेत. एकूण 2 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहेत.

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 26 ते 30 डिसेंबर, सेंचुरियन.

दूसरा सामना, 3 ते 7 जानेवारी, केपटाउन.

रोहित विराट का खेळणार नाहीत?

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.

टी 20 सारिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव , अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.