नवी दिल्लीः आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) सुरू होणार असून भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार असल्याने साऱ्यांच्या याकडे नजरा लागून राहिल्या आहेत. हा सामना रविवारी 28 ऑगस्ट रोजी होणार असून टीम इंडियाने गेल्या वर्षीच्या विश्वचषकातील पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी या सामन्याच्यानिमित्ताने भारतीय संघाला मिळाली आहे. त्यामुळे यानिमित्ताने विराट कोहलीही आपली या सामन्यात आपल्या खेळाचेही उत्तम लय साधू शकतो का याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कोहलीचा खराब फॉर्म हा सर्वाधिक चर्चेचा विषय असून त्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीला मात्र या सगळ्यावर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शतकांसाठी धडपडणारा विराट कोहली अलीकडच्या काही महिन्यांपासून धावांसाठीही संघर्ष करतो आहे.
भारताच्या टी-20 संघातील त्याच्या स्थानावर मात्र सातत्याने सवाल उपस्थित केले जात आहेत. मात्र, निवड समिती, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला असून भारताचा माजी कर्णधार गांगुलीलाही विराट कोहली पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये परतेल असा विश्वास आहे मात्र त्याने त्याच्या धावांकडे बोट करुन त्याने पूर्वीसारख्याच धावा केल्या पाहिजेत असंही स्पष्टपणे सांगितले आहे.
शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुलीला कोहलीच्या फॉर्मबद्दल सवाल विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितले की, कोहलीला केवळ भारतासाठीच नाही तर स्वत:साठीही धावा करण्याची गरज आहे. त्यामुळे त्याच्यासाठी उद्याचे सगळेच सामने महत्वाचे असतील आणि तो पूर्वीसारखाच पुन्हा पुनरागमन करील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आशिया चषकातील शतकांची प्रतीक्षा कोहली संपवू शकेल का? कोहलीच्या शतकांवर प्रश्न करण्यात आल्यावर गांगुलीने सांगितले की, कोहली आपल्या खेळासाठी नक्कीच मेहनत घेत आहे मात्र आशिया चषकात त्याची शक्यता कमी दिसते आहे, मात्र आपण सर्वजणच त्याच्या शतकाकडे डोळे लावून बसलो असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी तितकीच त्याची मेहनतही महत्वाची आहे. टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजाकडे वेळ कमी असतो, त्यामुळे शतक झळकावण्याची शक्यता कमी होते पण कोहलीसाठी होणारे सामने आशादायी ठरतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके झळकावणारा माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी गेल्या तीन वर्षापासून खेळासाठी वाईट काळ चालू आहे. नोव्हेंबर 2019 पासून त्याने एकही शतक झळकावलेले नाही, त्यामुळे या काळात तर त्याने उत्तम खेळले पाहिजे असंही मत व्यक्त केले जात आहे. विराट हा तिन्ही फॉरमॅटमध्ये तो उत्तम खेळला आहे. नुकताच झालेला इंग्लंड दौराही कोहलीसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये वाईट ठरला होता, त्यानंतर त्याने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावेळी त्याने विश्रांती घेतली असली तरी त्याने आता आशिया चषकासह पुनरागमन करत आहे.