“आता वेळ आली आहे..”. रोहित शर्माचा संयम अखेर सुटला, मेलबर्न कसोटीपूर्वी मागितले अपडेट

| Updated on: Dec 19, 2024 | 6:05 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची रंगत तिसऱ्या सामन्यानंतर वाढली आहे. दोन्ही संघांसाठी पुढचे दोन्ही सामने करो या मरोची लढाई आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्माचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यामुळे आता चौथ्या कसोटी काय होते याकडे लक्ष लागून आहे.

आता वेळ आली आहे... रोहित शर्माचा संयम अखेर सुटला, मेलबर्न कसोटीपूर्वी मागितले अपडेट
Follow us on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. यामुळे तीन सामन्यानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली गेली आहे. पण उर्वरित दोन्ही सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. कारण या दोन सामन्यांवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित सुटणार आहे. भारताला अंतिम फेरी गाठायची असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चौथ्या कसोटीसाठी कंबर कसली आहे. मेलबर्नमध्ये हा कसोटी सामना होणार आहे. पण या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्माने मोहम्मद शमीबाबत अपडेट मागितला आहे. त्याने थेट एनसीएल याबाबत अपडेट देण्यास सांगितलं आहे. रोहित शर्माने सांगितलं की, ‘मला वाटतं की आता वेळ आली आहे. ही योग्य वेळ आहे की शमीबाबत ताजे अपडेट काय आहेत? एनसीएने पुढे येऊन याबाबत योग्य ती माहिती द्यावी.’ रोहित शर्माने शमीबाबत ब्रिस्बेनमध्ये पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं.

मोहम्मद शमी सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. पण त्याला गुडघ्याशी निगडीत समस्या आहे. रोहित शर्माने पुढे सांगितलं की, ‘भारतातून एखादा खेळाडू ऑस्ट्रेलियात यावा आणि दुखापतीमुळे बाहेर बसावा हे काही पटण्यासारखं नाही. तुम्हाला सर्वांना माहिती की अशा परिस्थितीत काय होतं ते?’ रोहित शर्माने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा चेंडू आता एनसीएच्या पारड्यात टाकला आहे. त्यामुळे मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियात जाणार की नाही हे तेव्हाच स्पष्ट होईल.

रोहित शर्माने पुढे सांगितलं की, ‘100 टक्के नाही तर 200 टक्के खात्री असायला हवी तेव्हाच आम्ही शमी खेळवण्याचा विचार करू शकतो. जर एनसीएला वाटत असेल की तो रिकव्हर झाला आहे आणि खेळण्यासाठी फिट आहे तर मला त्याचं संघात येण्याचा आनंद होईल.’ चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. अजून या कसोटी सामन्यासाठी 6 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे शमीला क्लियरन्स मिळेपर्यंत वेळ लागेल असंच दिसत आहे. त्यामुळे शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काही दिसणार नाही, असंच म्हणावं लागेल.