मुंबई : आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर्समुळे संपूर्ण सामन्याचं चित्र बदलल्याचं पाहिलं गेलं आहे. अगदी मोक्याची क्षणी इम्पॅक्ट प्लेयर एन्ट्री मारत सामन्याचा चेहरामोहराच बदलून टाकायचा. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेयरची भूमिका किती महत्त्वाचं आहे ते आयपीएल स्पर्धेत अधोरेखित झालं होतं. या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयने मोठं पाऊल उचललं आहे. इम्पॅक्ट प्लेयर नियम सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा 16 ऑक्टोबरपासून सुर होणार आहे.
इम्पॅक्ट प्लेयर नियम तसं पाहिलं तर मागच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत लागू होता. पण तेव्हा 14 वं षटक संपण्यापूर्वी खेळायची अनुमती आणि टॉसआधी त्यांची नावं देणं अनिवार्य होतं. आता आयपीएलप्रमाणे सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत चार पर्याय असतील त्यापैकी एका खेळाडूची निवड करता येणार आहे. “दोन्ही संघांना फक्त एकच इम्पॅक्ट प्लेयर खेळवण्याची अनुमती असेल. पण खेळवणं बंधनकारक नसेल.”, असं बीसीसीआयने आपल्या नियमावलीत सांगितलं आहे.
इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचं नुकसान होणार अशी चर्चा रंगली आहे. कारण गरजेच्या वेळी फलंदाज किंवा गोलंदाज आपली भूमिका बजावून जाऊ शकतो. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंची जागा आता इम्पॅक्ट प्लेयर घेईल.
दुसरीकडे, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हांगझोउ एशियन गेम्स स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला संघांना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही स्पर्धा यापूर्वी 2014 मध्ये इंचियोन येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र या स्पर्धेत भारताने सहभाग नोंदवला नव्हता. यावेळी वनडे वर्ल्ड कप 2023 आणि एशियन गेम्स एकत्र असल्याने दोन्ही संघ वेगवेगळे असतील. वनडे वर्ल्डकपसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात आणि एशियन कपसाठी शिखर धवन याच्या नेतृत्वात संघ खेळेल, अशी चर्चा आहे.