राजकोट | बेन डकेट याने टीम इंडिया विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी विस्फोटक शतकी खेळी केली आहे. डकेट याच्या कसोटी कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं आहे. डकेटने चौकार ठोकत बेझबॉल पद्धतीने शतक झळकावलं. डकेटने या 88 चेंडूच्या मदतीने शतक पूर्ण केलं. डकेटने तिसरं शतक हे 115.91 च्या स्ट्राईक रेटने लगावलं. डकेटच्या या खेळीत 19 चौकार आणि 1 सिक्सचा समावेश होता. डकेटने या शतकासह मोठा विक्रमही केला आहे.
बेन डकेट टीम इंडिया विरुद्ध वेगवान शतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. टीम इंडिया विरुद्ध वेगवान शतक करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर एडम ग्रिलख्रिस्ट याच्या नावावर आहे. एडम ग्रिलख्रिस्ट याने मुंबईत 2001 साली 84 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं होतं. दिग्गज क्लाइव लॉयड यांनी बंगळुरुत 1974 साली 85 बॉलमध्ये सेंच्युरी पूर्ण केली होती. त्यानंतर आता बेन डकेट याचा या यादीत समावेश झाला आहे.
दरम्यान टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि लोकल बॉय रवींद्र जडेजा या दोघांनी शतकी खेळी केली. तर डेब्यूटंट सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या दोघांनी चमकदार कामगिरी केली. रोहित आणि रवींद्र जडेजा याने दोघांनी अनुक्रमे 131 आणि 112 धावा केल्या. तर सरफराज खान 62 आणि ध्रुव जुरेलने 46 धावांचं योगदान दिलं.
बेन डकेट याचं झंझावाती शतक
A brilliant counter-attacking century from Ben Duckett 👊#WTC25 | #INDvENG 📝: https://t.co/vHdLWPgG5e pic.twitter.com/8r6MaPr4dl
— ICC (@ICC) February 16, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.