इंदूर | बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा 1 मार्चपासून इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाचा तिसरा सामना जिंकून पुन्हा एकदा बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर नाव कोरण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी अतिशय महत्वाचा सामना आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित या निर्णायक सामन्यात कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत उतरणार याबाबत अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या सामन्याआधी टीम इंडियाच्या एका खेळाडूने पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे यातून हे स्पष्ट झालंय की हा फ्लॉप ठरलेला खेळाडू तिसऱ्या कसोटीत खेळताना दिसणार आहे.
तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएस भरत याने पत्रकार परिषद घेतली. केएसने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात विशेष कामगिरी केलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीतून केएसला टीममधून बाहेर बसवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र त्याने पत्रकार परिषद घेतल्याने संघातील जागा नक्की असल्याचं म्हटलं जात आहे.
“मी दिल्लीत माझ्या खेळाची मजा घेतली. तुम्हाला तुमच्या डिफेंसवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. या खेळपट्टीवर खेळणं अशक्य नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा. तुमच्या नैसर्गिक खेळावर विश्वास ठेवा नक्कीच त्यामुळे धावा करण्याची संधी आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने मला सांगितलं की दिल्ली कसोटीतील दुसऱ्या डावात मी सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करेन. ऑस्ट्रेलिया ऑलआऊट होताच मी बॅटिंगसाठी सज्ज होतो. या खेळपट्टीवर शॉट सेलेक्शन योग्य असेल तर धावा होतात”, असं केएस भरत म्हणाला.
दरम्यान या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीनंतर उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण 3 सामन्यांची मालिका असणार आहे. या सीरिजला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.