अहमदाबाद | टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा शेवटचा कसोटी सामना हा 9 मार्चपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळणार आहे. टीम इंडिया या 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सलग 2 सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाला इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकून मालिकेतील खातं उघडलं. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक मारली. मात्र या पराभवामुळे टीम इंडियाची wtc final प्रतिक्षा वाढली. आता टीम इंडियाला wtc final साठी कोणत्याही परिस्थितीत चौथा सामना जिंकावा लागणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.
तिसऱ्या कसोटीनंतर आता चौथ्या सामन्यातूनही ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स बाहेर पडला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे.
पॅट कमिन्स चौथ्या कसोटीतूनही ‘आऊट’
Our hearts go out to Pat Cummins and his family ❤️
Smith to lead in Ahmedabad | @LouisDBCameron #INDvAUS https://t.co/g06zzNwieZ
— cricket.com.au (@cricketcomau) March 6, 2023
पॅटच्या आईची प्रकृती गंभीर असल्याने त्याला टीम मॅनेजमेंटने तिसऱ्या सामन्याआधी रिलीज केलं होतं. त्यानंतर पॅट सिडनीला परतला होता. तेव्हापासून पॅटला चौथ्या कसोटीतही खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात होतं. अखेर तो अंदाज खरा ठरलाय.
पॅट मालिकेतून बाहेर झाल्याने तिसऱ्या कसोटीनुसार चौथ्या सामन्यातही स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. स्टीव्हने ऑस्ट्रेलियाला या मालिकेत पहिलावहिला विजय मिळवून दिला होता. सलग 2 पराभवानंतर स्टीव्हने आपल्या कॅप्टन्सीत तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला इंदूरमध्ये 9 विकेट्सने विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता टीम मॅनेजमेंटने पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी ही स्टीव्हकडे दिली आहे.
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट.