भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भिडणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात यंदापासून पहिल्यांदाच एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. मालिकेतील सलामीच्या सामन्यात यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह भारतीय संघांचं नेतृत्व करताना दिसणार आहे. तर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्स याच्या खांद्यावर असणार आहे. भारत रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांशिवाय पहिल्या सामन्यात खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या दोघांच्या गैरहजेरीत कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. पहिला सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार? तसेच सामन्याला भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना पर्थ स्टेडियम, पर्थ येथे होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजून 20 मिनिटांनी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅच पाहता येईल.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड.