ऑस्ट्रेलिया ए ने टीम इंडिया ए चा 2 अनऑफीशियल टेस्ट मॅचमध्ये पराभव केला. ऑस्ट्रेलिया ए ने ऋतुराज गायकवाड याच्या कॅप्टन्सीतील टीम इंडिया ए ला 2-0 ने व्हाईटवॉश केला. त्यानंतर आता टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला (बॉर्डर गावसकर ट्रॉफी) सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीचा पर्थ येथे होणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने या पहिल्या सामन्यासाठी 13 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
निवड समिताने 2 नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. त्यापैकी एक पर्थ कसोटीतून पदार्पण करु शकतो. नॅथन मॅकस्विनी हा उस्मान ख्वाजा याच्यासोबत ओपनिंग करु शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅथन मॅकस्विनी याचं पर्थमध्ये कसोटी पदार्पण होऊ शकतं. तसेच जॉश इंग्लिश याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र जॉशला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळेल का? याबाबत शंका आहे.
पहिला सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ.
दुसरा सामना, 6 ते 10 डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट).
तिसरा सामना, 14 ते 18 डिसेंबर, गाबा.
चौथा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न.
पाचवा सामना, 3 ते 7 जानेवारी, सिडनी.
दरम्यान बीसीसीआय निवड समितीने 25 ऑक्टोबरला या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. निवड समितीने या मालिकेसाठी मुख्य संघात 18 खेळाडूंची निवड केली आहे. तर 3 राखीव खेळाडूंना संधी दिली आहे.
पर्थ कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम
SQUAD 🤩 The Border-Gavaskar Trophy is almost upon our men’s national team, with 13 of our very best ready and raring to face India in Perth later this month #AUSvIND pic.twitter.com/QbRVJNmllw
— Cricket Australia (@CricketAus) November 9, 2024
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.