नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर सीरिजमधील पहिली मॅच 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर करण्यात आलं आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीआधी रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. रोहितने या पत्रकार परिषदेत खेळपट्टीवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नांची सडेतोडपणे उत्तरं दिली. रोहित नक्की काय बोलला हे आपण जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया मीडियाकडून टीम इंडियावर खेळपट्टी स्वत:च्या फायद्यानुसार तयार केल्याचे आरोप लगावण्यात आले आहेत. या आरोपांवर रोहितने प्रतिक्रिया दिली आहे.
“आमचं लक्ष हे खेळावर आहे. ऑस्ट्रेलिया मीडिया काय बोलतेय याकडे अजिबात लक्ष नाही. जर तुम्ही चांगली तयारी केली, तर परिणामही चांगलेच मिळतात. फक्त पीचवरच लक्ष देऊ नका. क्रिकेटवर फोकस करा. नागपूरमध्ये चांगलं खेळून चालणार नाही. दर्जेदार कामगिरी करावी लागेल”, असं रोहितने स्पष्ट केलं.
सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. ऑस्ट्रेलिया मीडियाने फोटो शेअर खेळपट्टी आपल्या फायद्यानुसार तयार केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक अशी मालिका आहे. या मालिकेच्या निकालावरच टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपच्या फायनलमध्ये पोहचणार की नाही, हे ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामना हा 7 ते 11 जून 2023 दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
रोहित शर्मा याची पत्रकार परिषद
Permutation-combination for the #INDvAUS Test series opener❓#TeamIndia | @ImRo45 pic.twitter.com/njzAzGLNEp
— BCCI (@BCCI) February 8, 2023
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा
चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.