मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामधील सामन्यात हैदराबाद संघाने विजय मिळवला आहे. प्रथम बॅटींग करणाऱ्या राजस्थानने हैदराबादला 215 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना अब्दुल समदने सिक्स मारत विजय मिळवून दिला. याआधी राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर याने 95 धावांची आक्रमक खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अवघ्या 5 धावांनी बटलरचं शतक हुकलं कारण भुवनेश्वर कुमार याने टाकलेल्या अफलातून यॉर्करचं त्याच्याकडे काहीचं उत्तर नव्हतं.
पाहा व्हिडीओ-
Did You Watch?
A fine yorker!
A successful DRS call.
…that’s what it took to end the brilliant Buttler show!#TATAIPL | #RRvSRH | @BhuviOfficial pic.twitter.com/veuzutLtEz— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
19 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार याने तिसरा चेंडू यॉर्कर टाकला, जोस बटलर गडबडला त्याला समजल नाही अन् बॉल पॅडवर आदळला. अंपायरने आऊट दिलं नाही त्यानंतर भुवीने डीआरएस घेतला. त्यामध्ये बॉल बॅट न लागता पॅडला लागलेला होता आणि थेट विकेटवर गेलेला.
भुवीच्या या बॉलने बटलर 95 धावांवर आऊट झाला. मात्र 5 धावांनी त्याचं यंदाच्या मोसमातील शतक राहून गेलं. बटलर गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरत होता. त्यालाही आपली फॉर्मची गाडी रूळावर आणायची होती. आजचा सामना त्याच्यासाठी पर्वणी ठरला खरा पण संघ हरल याची खंत त्याच्या मनात राहणार आहे.
दरम्यान, अगदी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखा हा रोमांचक सामना झालेला पाहायला मिळाला. ग्लेन फिलिप्सने सलग 3 सिक्स मारत संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. शेवटला या आशेचं विजयामध्ये रूपांतर करत अब्दुल समदने फ्री हिटवर सिक्स मारत सामना खिशात घातला.