मुंबई : आगामी आयपीएल 2024 आधी लिलावाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. सर्व फ्रँचायझींनी रिटेने आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. प्रत्येक फ्रँचायझी आता संघबांधणीच्या तयारीला लागले आहेत. आयपीएल आधी लिलावात असलेले खेळाडू सामन्यांंमध्ये चमकदार कामगिरी करत फ्रँचायझींचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. कोणत्याही खेळाडूने क्लास फॉर्म दाखवला आणि एखाद्या फ्रँचायझीला तसाच खेळाडू हवा असेल. तर त्या खेळाडूला संघात घेण्यासाठी संबंधित फ्रँचायझी पाण्यासारखा पैसा ओततील. अशातच एका खेळाडूने वादळी खेळी करत फ्रँचायझींना पैसे तयार ठेवायला लावले आहेत.
बिग बॅश लीगच्या 13 व्या सीझनमध्ये कॉलिन मुनरो याने 99 धावांची नाबाद तुफानी खेळी केली. ब्रिस्बेन हीट संघाकडून ओपनिंगला आलेल्या उस्मान ख्वाजा आणि कॉलिन मुनरो आले होते. मुनरो याने 61 बॉलमध्ये नाबाद 99 धावा केल्या यामध्ये 9 चौकार आणि 6 षटकार मारले. अवघ्या एका धावेने त्याचं शतक हुकलं असलं तरी जिगरबाज खेळीची सर्व क्रिकेट वर्तुळात चर्चा होत आहे.
आयपएलच्या लिलावाला 13 दिवस बाकी असताना मुनरो याने केलेल्या खेळीने त्याच्यावर फ्रँचायझी पैसे लावण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये मुनरो याने शेवटची आयपीएल खेळली होती त्यानंतर त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने रिलीज केलं. 2018 च्या लिलावामध्ये दिल्लीने त्याला 1.9 कोटींना खरेदी केलं होतं. 2019 मध्येही त्याच किमतीत तो खेळला मात्र काही खास कामगिरी करता आली नाही. शेवटी दिल्लीने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला.
How do you feel @HeatBBL fans?! Fast finish from Max Bryant but Colin Munro is stranded on 99 😵#BBL13 pic.twitter.com/qTp1E4zaVL
— KFC Big Bash League (@BBL) December 7, 2023
दरम्यान, कॉलिन मुनरो याने आणखी दोन ते तीन तुफानी खेळी केल्या तर ज्या संघाला आक्रमक ओपनरची गरज आहे ते त्याच्यासाठी पैसे लावतील. मुनरो याने आपली बेस प्राईज ही 1.5 कोटी ठेवली आहे. कोणता संघ त्याच्यासाठी बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.