Video : जसप्रीत बुमराह याच्या बॉलिंग ॲक्शनमध्ये मोठा बदल, पाहा काय फरक झाला ते

| Updated on: Jul 31, 2023 | 9:57 PM

जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजातील प्रमुख अस्त्र...पण बुमराहच्या बॉलिंग शैलीत फरक दिसल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे मैदानात कशी कामगिरी करणार याकडे लक्ष लागून आहे.

Video : जसप्रीत बुमराह याच्या बॉलिंग ॲक्शनमध्ये मोठा बदल, पाहा काय फरक झाला ते
Video : जसप्रीत बुमराह याचं संघात पुनरागमन, बॉलिंग अॅक्शन बदलल्याने टेन्शन वाढलं
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वी टीम इंडियामध्ये जसप्रीत बुमराहची एन्ट्री झाली आहे. त्याच्या पुनरागमनाने भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण जसप्रीत बुमराह याने भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना सळो की पळो करून सोडलं आहे. असं असताना जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओखालील काही कमेंट्सने विचार करण्यास भाग पाडलं आहे. कारण जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीत फरक दिसून आला आहे. बुमराह याच्या चाहत्यांना ही बाब लगेच लक्षात आली आहे. इतकंच काही तर गोलंदाजीची धार कमी झाल्याचं जाणवत आहे. अनुभव नसलेल्या फलंदाजांना बुमराह गोलंदाजी करताना दिसत असून तोही सहज खेळत असल्याचं दिसत आहे. इतकंच काय तर एकही चेंडू बीट करता आला नाही.

बुमराह याच्या गोलंदाजीत बदल

बुमराह याचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ नीट पाहिला असता त्याच्या गोलंदाजीत बदल दिसून येत आहे. याआधी चेंडू टाकताना कमरेतून थोडा आर्क शेपमध्ये वाकत होता. पण आता त्यात बदल झाला आहे. त्यामुळे फॉलोथ्रूमध्ये फरक जाणवत आहे. जसप्रीत बुमराह याने राउंड द विकेट आणि ओव्हर द विकेट गोलंदाजी केली. तेही फक्त डावखुऱ्या फलंदाजांनाच गोलंदाजी करत करत होता. यात तो फक्त स्टॉक डिलिव्हरी टाकताना दिसला.

बुमराहसमोर उजव्या हाताचा फलंदाज असता तर त्याने सरळ चेंडू टाकला असता किंवा कटर करण्याचा प्रयत्न केला असता, पण असं काही दिसलं नाही.रनअप करताना त्याचा फिटनेस चांगला असल्याचं जाणवलं पण पुढचा प्रवास वाटतो तितका सोपा नसेल. मॅच प्रेशरमध्ये सर्वच मसल्स वापरले जातील तेव्हा काय करणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, त्याच्या गोलंदाजीचा वेग कमी झाला असावा असा अंदाजही बांधला जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बुमराहने बंगळुरुजवळील अलूर क्रिकेट मैदानात इंट्रा स्क्वॉड प्रॅक्टिस सामन्यात मुंबईच्या काही युवा फलंदाजासमोर गोलंदाजी केली. दुखपतीतून सावरल्यानंतर त्याने पहिल्यांदाच एखाद्या सामन्यात गोलंदाजी केली. बुमराहने दोन टप्प्यात एकूण 10 षटकं टाकली. सलामी फलंदाज अंगकृष रघुवंशी याची विकेट घेण्यात यश मिळालं.