मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर मालिकेतील चौथा सामना हा 23 फेब्रुवारीपासून रांचीत खेळवण्यात येणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी केलेल्या घोषणेची एकच चर्चा पाहायला मिळतेय. ही घोषणाच अशी आहे, ज्यामुळे प्रत्येक क्रिकेट चाहता थक्क झाला आहे. क्रिकेट अध्यक्षांनी नक्की काय घोषणा केली आहे, हे आपण जाणून घेऊयात.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत यंदा हैदराबाद टीमने उल्लेखनीय कामगिरी करत प्लेट ग्रुपमधून अव्वल स्थान पटकावलं आहे. हैदराबादने अंतिम फेरीत मेघालयचा धुव्वा उडवत प्लेट ग्रुपमध्ये बाी मारली. त्यानंतर आता एचसीए अर्थात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव अरिश्रपल्ली यांनी हैदराबादच्या खेळाडूंसाठी आगामी 3 हंगामात रणजी एलीट ट्रॉफी जिंकल्यास मोठं बक्षिस देणार असल्याची घोषणा केली आहे. जगन मोहन राव अरिश्रपल्ली यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
“जर टीमने पुढील 3 वर्ष रणजी ट्रॉफी स्पर्धेत एलीट ग्रुपमधून विजेतेपेट पटकावलं, तर प्रत्येक खेळाडूला बीएलडब्ल्यू आणि संघाला 1 कोटी रोख बक्षिस”, असं ट्विट जगन मोहन राव अरिश्रपल्ली यांनी केलं आहे. जगन मोहन राव अरिश्रपल्ली यांनी ट्विटमध्ये सचिन तेंडुलकर , बीसीसीआय सचिव जय शाह आणि इतरांना मेन्शन केलं आहे.
जगन मोहन राव अरिश्रपल्ली यांचं ट्विट
BMW CAR TO EACH PLAYER & 1 Cr cash Reward to Team.
If the team wins the Ranji Elite Trophy in Next 3 years.@hydcacricket @BCCI @JayShah @sachin_rt @DHONIism @IPL @srhfansofficial @CSKFansOfficial pic.twitter.com/cONhQQBTVg
— Jagan Mohan Rao Arishnapally (@JaganMohanRaoA) February 20, 2024
जगन मोहन राव अरिश्रपल्ली यांनी 20 फेब्रुवारी रोजी प्लेट ग्रुपमध्ये यशस्वी कामगिरी केल्यांनतर हैदराबाद टीमसाठी 10 लाख रुपये रोख बक्षिस म्हणून देणार असल्याचं जाहीर केलं. तसेच स्पर्धेत सर्वोत्तम कामिगरी केल्यामुळे कॅप्टन तिलक वर्मा याच्यासह एकूण 5 जणांना प्रत्येकी 50 हजार रुपये बक्षिसाची घोषणा केली. हैदराबादने प्लेट ग्रुपमध्ये बाजी मारली. त्यामुळे हैदराबाद टीम पुढील वेळेस एलीट ग्रुप सीमधून खेळेल.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा होत असतात. मात्र त्याचं स्वरुप क्रिकेट चाहत्यांना माहिती नसतं. आता रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एलीट आणि प्लेट ग्रुप ही नक्की भानगड काय? याबाबतही क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम आणि गोंधळ आहे. आता या दोन्हीमध्ये नक्की फरक काय, हे आपण जाणून घेऊयात.
रणजी ट्रॉफी स्पर्धा ही 2 प्रकारात खेळली जाते. यात एलीट आणि प्लेट अशा 2 प्रकाराचा समावेश आहे. प्लेट ग्रुपमध्ये जिंकणारी टीम आगामी मोसमात एलीट ग्रुपमधून खेळण्यासाठी पात्र ठरते. तसेच एलीट ग्रुपमध्ये सर्वात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या संघाची रवानगी ही प्लेट ग्रुपमध्ये केली जाते.
एलीट ग्रुपमध्ये 6 टीम असतात. एलीट ग्रुपमध्ये तब्बल 32 संघांचा समावेश असतो. या 32 संघांची विभागणी 8-8 हिशोबाने 4 गटात केली जाते. एलीट ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. प्रत्येक ग्रुपमध्ये 8 संघ असतात. प्रत्येक टीम 7 सामने खेळते. प्रत्येक गटातील 2 अव्वल टीम क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरते. त्यानंतर पुढील सेमी फायनल, फायनल आणि अखेरीस विजेता संघ निश्चित होतो.