मुंबई : कोरोना प्रादुर्वाभाचा सगळ्या जगावर विपरीत परिणाम झालाय तसाच तो खेळावरही झालावर. त्यात आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे विविध देशांत पुन्हा टाळेबंदीची हाक देण्यात आली आहे. अशातच आयसीसीने जून 2020 साली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लादले होते. हेच निर्बंध आता जुलै 2021 पर्यंत लागू असतील. लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार गोलंदाजांना चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करता येणार नाही. साहजिकच त्याचा तोटा गोलंदाजांना होणार आहे. (Bowlers Cannot Use Saliva World test ChampionShip)
गोलंदाज चेंडू चमकवण्यासाठी अनेक वेळा लाळेचा वापर करतात. त्याने चेंडूची चमक कायम राहते. चेंडूला एक प्रकारची लकाकी येते. याचा सरळ सरळ फायदा हा गोलंदाजांना होतो तर त्याचा तोटा हा बोलर्सला होतो. मात्र आयसीसीच्या निर्बंधानुसार बोलर्सला चेंडू चमकवण्यासाठी आता लाळेचा वापरता येणार नाही. खेळाडूंना चेंडू चमकवण्यासाठी घामाचा वापर करता येईल.
खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून संघ व्यवस्थापन तसंच देशांचं क्रिकेट नियामक मंडळ आणि आयसीसी प्रयत्नशील आहे. खेळाडूंनाही कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड नियमांचं पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. सलामीची लढत गतविजेती मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघादरम्यान होणार आहे. हा हंगाम संपल्यानंतर भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असतील. सध्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी ट्वेन्टी आणि एकदिवसीय मालिकेदरम्यान सॉफ्ट सिग्नलवरुन बराच वाद झालेला पाहायला मिळाला. भारतीय खेळाडूंना सॉफ्ट सिग्नल निर्णयाचा फटका बसला. त्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कार्यकारी समितीकडे यावर चर्चा करण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे या निर्णयावरही विचार केला जाऊ शकतो.
(Bowlers Cannot Use Saliva World test ChampionShip)
हे ही वाचा :
Irfan Pathan Corona : सचिन, युसूफ पाठोपाठ इरफान पठाणही कोरोना पॉझिटिव्ह!