Video : विराट कोहलीसारखं करायला गेला पाकिस्तानचा मोहम्मद नवाज, तंजीम हसन थेट अंगावर गेला

| Updated on: Jan 13, 2025 | 3:39 PM

विराट कोहलीने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत सॅम कोन्टासला मारलेला धक्का चर्चेचा विषय ठरला होता. आता असं करणं एक ट्रेंड होत चाललं आहे. याची प्रचिती बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळाली. पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद नवाज आणि बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज तंजीम हसन यांच्यात अशीच खांद्याने धक्काबुक्की झाली.

Video : विराट कोहलीसारखं करायला गेला पाकिस्तानचा मोहम्मद नवाज, तंजीम हसन थेट अंगावर गेला
Follow us on

बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेतील 17 वा सामना खुलना टायगर्स आणि सिलहट स्ट्रायकर्स यांच्यात रंगला. खुलना टायगर्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिलहट स्ट्रायकर्सने 20 षटकात 5 गडी गमवून 182 धावा केल्या. पण या धावांचा पाठलाग करताना खुलना टायगर्स संघ अडखळला. खुलना टायगर्सने 20 षटकात 9 गडी गमवून 174 धावा केल्या. खुलना टायगर्सचा निसटता 8 धावांनी पराभव झाला. पण या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजने तंजीम हसनला धक्का मारला आणि वातावरण बिघडलं. 16 षटकात खुलना टायगर्सच्या 16 षटाक 130 धावा केल्या होत्या. 24 चेंडूत 52 धावांची गरज होती. पाकिस्तानचा मोहम्मद नवाज आक्रमक खेळी करत होता. 17 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 33 धावांवर खेळत होता. पण 18 व्या चेंडूचा सामना करताना समोर तंजीम हसन होता. त्याने पहिल्याच चेंडूवर मोहम्मद नवाजला तंबूचा रस्ता दाखवला.

तंझीमने टाकलेला स्लोअर आर्म चेंडू खेळताना मोहम्मद नवाज फसला आणि साकिबच्या हाती झेल देऊन बाद झाला. पण नवाज तंबूत जात असताना सवयीप्रमाणे तंझीम काहीतरी बडबडला. त्यामुळे आधीच बाद आणि त्यात त्याची बडबड ऐकून मोहम्मद नवाज संतापला आणि खांद्याने धक्का मारला. या प्रकारानंतर दोन खेळाडूंमध्ये शा‍ब्दिक चकमक घडली. त्यांच्यातील वाद पाहता पंच आणि इतर खेळाडूंनी हस्तक्षेप केला आणि भांडण सोडवलं. आता त्याच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

सिलहट स्ट्रायकर्स (प्लेइंग इलेव्हन): रहकीम कॉर्नवॉल, जॉर्ज मुंसे, झाकीर हसन (विकेटकीपर), आरोन जोन्स, रॉनी तालुकदार, नाहिदुल इस्लाम, जाकेर अली, अरिफुल हक (कर्णधार), तंजीम हसन साकिब, रीस टोपले, रुएल मिया.

खुलना टायगर्स (प्लेइंग इलेव्हन): विल्यम बोसिस्टो, मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराझ (कर्णधार), महिदुल इस्लाम अंकोन (विकेटकीपर), इमरुल कायस, अबू हैदर रोनी, मोहम्मद नवाज, नसुम अहमद, हसन महमूद, दरविश रसूल, झियाउर रहमान.