ढाका : बांगलादेश प्रीमियर लीगमधील 18 व्या सामन्यात फॉर्च्यून बरिशलने रंगपूर रायडर्सचा 67 धावांनी पराभव केला. इफ्तिखार अहमद आणि शाकिब अल हसन ही जोडी विजयाचे हिरो ठरले. इफ्तिखारने शानदार शतक ठोकलं. इफ्तिखारने 45 बॉलमध्ये नॉटआऊट 100 धावा केल्या. या दोघांनी केलेल्या वादळी खेळीच्या जीवावर फॉर्च्यून बरिशलने 238 धावांपर्यंत मजल मारली. मात्र रंगपूर रायडर्सला 171 धावाच करता आल्या. या दरम्यान शाकिब आणि इफ्तिखार या दोघांनी वर्ल्ड रेकॉर्डही ब्रेक केला.
शाकिब आणि इफ्तिखार ही जोडी टी 20 क्रिकेटमध्ये 5 व्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करण्यात यशस्वी ठरली. इफ्तिखार आणि शाकिब या सामन्यात 5 व्या विकेटसाठी 86 बॉलमध्ये 192 धावांची भागीदारी केली, जो वर्ल्ड रेकॉर्ड ठरला आहे.
शाकिब-इफ्तिखार यांच्या आधी टी 20 क्रिकेटमध्ये 5 व्या विकेट्ससाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम हा बर्मिंघम बीयर्सचे फलंदाज होज आणि मूसले यांच्या नावावर होता. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 रन्सची पार्टनपशीप केली होती. तर हाशिम अमला आणि ड्वेन ब्राव्होने पाचव्या विकेट्साठी 150 धावांची भागीदारी केली. मात्र आता हा वर्ल्ड रेकॉर्ड इफ्तिखार आणि शाकिबच्या नावावर आहे.
इफ्तिखार आणि शाकिब या जोडीने अडचणीत सापडलेल्या टीमला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवलं. फॉर्च्यून बरिशने पावरप्लेमध्येच 4 विकेट्स गमावल्या. मात्र यानंतर इफ्तिखार आणि शाकिब या दोघांनी दया माया न दाखवता धु धु धुवायला सुरुवात केली. दोघांनी मिळून 15 चौकार आणि 15 षटकार लगावले. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. दोघांचा स्ट्राईक रेट हा 200 प्लस होता. परिणामी टीमने 238 धावांचा डोंगर उभा केला.
इफ्तिखारची फटकेबाजी
Iftikhar Ahmed’s three successive sixes off Haris Rauf ? #BPL2023 pic.twitter.com/fu1Uc1f0NP
— Farid Khan (@_FaridKhan) January 20, 2023
इफ्तिखारने 45 बॉलमध्येच पहिलंवहिलं टी 20 शतक साजरं केलं. तर शाकिबला शतक करता आलं नाही. मात्र त्यानेही धमाकेदार खेळी केली.
दरम्यान याविजयासह फॉर्च्यून बरिशलने पॉइंट्स टेबरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. फॉर्च्यूनने 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर रंगपूर रायडर्सने 5 पैकी 3 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. रंगपूर रायडर्स पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे.