Video : ब्रायन लारा याने साधला शुभमन गिल आणि इशान किशन यांच्याशी संवाद, चर्चेत सांगितल्या ‘त्या’ आठवणी

| Updated on: Aug 02, 2023 | 5:10 PM

टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून कसोटी आणि वनडे मालिका जिंकली आहे. तर पाच सामन्यांची टी 20 मालिकेला 3 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी ब्रायन लारा याने शुभमन गिल आणि इशान किशन यांच्याशी संवाद साधला.

Video : ब्रायन लारा याने साधला शुभमन गिल आणि इशान किशन यांच्याशी संवाद, चर्चेत सांगितल्या त्या आठवणी
Video :ब्रायन लारा याने संवाद साधताच शुभमन गिल आणि इशान किशन आलं भरून, म्हणाले...
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : ब्रायन लारा हे क्रिकेट विश्वातलं मोठं नाव..ब्रायन लाराच्या नावाशिवाय क्रिकेटचं विश्व पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे दिग्गज खेळाडूची भेट घेणं एक योगच म्हणावा लागेल. हा योग सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या वाटेला आला. शुभमन गिलं आणि इशान किशन यांना ब्रायन लारा याच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. त्या क्रिकेटपटूला पाहून क्रिकेटचे धडे गिरवले त्याच्यासोबत संवाद साधताना इशान किशन आणि शुभमन गिल यांना भरून आलं होतं. तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी हा संवाद झाला होता. आता बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ब्रायन लारा, इशान किशन आणि शुभमन गिल बोलताना दिसत आहेत.

ब्रायन लारा, इशान किशन आणि शुभमन गिल यांच्यात काय संवाद झाला?

व्हिडीओची सुरुवात दिग्गज खेळाडू ब्रायन लाराच्या बोलण्याने होते. “मी खूप आनंदी आहे की, इशान किशन आणि शुभमन गिल यांच्यासाखरे यंगस्टर माझ्या नावाच्या स्टेडियमध्ये खेळत आहेत.”

लारानंतर लगेचच शुभमन गिल याने मोर्चा सांभाळला आणि म्हणाला, “आज तुम्हाला पाहून सर्वकाही आठवलं. कशा पद्धतीने चेंडू मारायचा हे मी पाहिलं आहे.”

शुभमन गिलनंतर इशान किशन म्हणाला की, “मला इन्स्टाग्रामवर टेक्स्ट मेसेज केल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला होता. दिग्गज खेळाडू मला कसं काय टेक्स्ट करू शकतो. मला तेव्हा खूपच आनंद झाला होता.”

लाराने पुढे सांगितलं की, “भारत माझं दुसरं घर आहे. भारतात नवोदित खेळाडूंची एक पिढी घडत आहे. इशान आणि गिल याचं उत्तम उदाहरण आहे. मला याचा खूप खूप अभिमान वाटतो.”

भारताने तिसरा एकदिवसीय सामना 200 धावांनी जिंकत मालिका खिशात घातली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 गडी गमवून 351 धावा केल्या. त्या बदल्यात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 151 धावांवर बाद झाला. या सामन्यात इशान किशन आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकी खेळी केली. इशान किशन याने 64 चेंडूत 77 धावा केल्या. तर शुभमन गिल याने 92 चेंडूत 85 धावांची खेळी केली.