कसोटीतील नाबाद 400 धावांचा रेकॉर्ड कोण मोडणार? खुद्द ब्रायन लाराने सांगितलं या भारतीय खेळाडूचं नाव

| Updated on: Dec 06, 2023 | 3:11 PM

क्रिकेट विश्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यानंतर मोठ्या सन्मानाने घेतलं जाणारं नाव म्हणजे ब्रायन लारा..लेफ्ट हँडेड ब्रायन लाराची बॅटिंग शैली कोणीही विसरू शकत नाही. ब्रायन लाराने आपल्या फलंदाजीने भलभल्या गोलंदाजांना घाम फोडला आहे. ब्रायन लाराचा कसोटीतील नाबाद 400 धावांचा विक्रम मोडणं खूपच कठीण आहे. पण हा रेकॉर्ड भविष्यात कोण मोडणार? याबाबत खुद्द ब्रायन लाराने खुलासा केला आहे.

कसोटीतील नाबाद 400 धावांचा रेकॉर्ड कोण मोडणार? खुद्द ब्रायन लाराने सांगितलं या भारतीय खेळाडूचं नाव
कसोटीत नाबाद 400 धावांचा विक्रम भारतीय खेळाडूच मोडणार! ब्रायन लाराने स्वत:च नाव सांगून टाकलं
Follow us on

मुंबई : टेस्ट क्रिकेटमध्ये एकदा का खेळपट्टीवर ब्रायन लारा टिकला की भल्याभल्या गोलंदाजांची कसोटी लागायची. त्याला आऊट करणं म्हणजे कठीण काम असायचं. त्याचे कसोटीतील विक्रम पाहून असंच म्हणावं लागेल. 90 च्या दशकात ब्रायन लाराने 375 धावांची खेळी केली होती. इंग्लंड विरुद्ध 16 एप्रिल 1994 साली त्याने हा विक्रम केला होता. यात 45 चौकारांचा समावेश होता. कित्येक वर्षे हा विक्रम अबाधित होता. त्यानंतर 2003 साली ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू हेडनने हा विक्रम मोडीत काढला. पर्थवर झिम्बाब्वे विरोधात मॅथ्यू हेडनची बॅट चालली. 34 चौकार आणि 11 षटकारांच्या मदतीने 380 धावा केल्या. पण हा विक्रम ब्रायन लाराने अवघ्या सहा महिन्यात ब्रेक केल्या. 10 एप्रिल 2004 साली इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नाबाद 400 धावांची खेळी केली. त्यानंतर गेली 19 वर्षे हा विक्रम अबाधित आहे. या विक्रमाच्या आसपासही कोणी पोहोचलं नाही. त्यामुळे भविष्यात हा विक्रम मोडीत काढेल अशी शक्यताही कमी आहे. असं असताना हा विक्रम कोण मोडीत काढू शकतो याबाबत खुद्द ब्रायन लारा याने सांगितलं आहे. इतकंच काय तर बोललो ते लिहून ठेवा असं ठामपणे सांगितलं देखील आहे.

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याने हा विक्रम शुबमन गिल मोडू शकतो असं सांगितलं आहे. इतकंच काय तर 400 च्या पार धावा करेल. तसेच काउंटी चॅम्पियनशिपच्या 501 धावांचा विक्रमही मोडीत काढेल, असंही स्पष्टपणे सांगितलं. “गिल हा चांगला फलंदाज आहे. नव्या पिढीतील टॅलेंटेड बॅट्समन आहे. तो क्रिकेट विश्वावर येत्या काही वर्षात राज्य करेल. मला विश्वास आहे की, तो क्रिकेटमधील मोठे विक्रम मोडीत काढेल.”, असं ब्रायन लारा म्हणाला.

“वनडे वर्ल्डकप स्पर्धेत शुबमन गिलने सेंच्युरी केली नाही. पण त्याची आधीची फलंदाजी पाहिली आहे. त्याने क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मेटमध्ये शतक केलं आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक केलं आहे. आयपीएलमध्येही त्याने मॅच विनिंग सामने खेळले आहेत. भविष्यात आयसीसी स्पर्धांमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपेल असा विश्वास आहे.”, असंही ब्रायन लारा पुढे म्हणाला.

शुबमन गिलच हा विक्रम का मोडेल असं वाटतं? त्या प्रश्नावरही ब्रायन लाराने उत्तर दिलं. “त्याची बॅटिंग स्टाईल जबरदस्त आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर विश्वास आहे. सीमरला तशा पद्धतीने फटकेबाजी करणं म्हणजे अविश्वसनीय आहे.”, असं स्पष्टीकरण ब्रायन लाराने दिलं.