मुंबई | सरफराज खान आणि मुशीर खान या सख्ख्या भावांनी आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवलाय. या दोन्ही भावांनी 2 वेगवेगळ्या संघांविरुद्ध शतकी कामगिरी करत टीम इंडियाला भक्कम स्थितीत आणून ठेवण्यात निर्णायक भूमिका बजावलीय. थोरला सरफराज खान हा इंडिया ए साठी इंग्लंड लायन्स विरुद्ध खेळतोय. तर धाकटा मुशीर अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करतोय. या दोघांनी इंग्लंड लायन्स आणि आयर्लंड विरुद्ध शतकी खेळी केलीय.
टीम इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दुसरा अनऑफीशियल सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात सरफराज खान याने 160 बॉलमध्ये 16 चौकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 161 धावांची खेळी केली. तर तिथे मुशीरने 118 धावांची खेळी केली.
मुशीरने 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 106 बॉलमध्ये ही खेळी केली. मुशीर व्यतिरिक्त कॅप्टन उदय सहारन याने 75 धावांचं योगदान दिलं. या जोरावर टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 301 धावा केल्या. त्यामुळे आता आयर्लंडला विजयासाठी 302 धावांचं आव्हान मिळालंय.
मुशीरचा शतकी दणका
Musheer Khan’s solid century has put India in command in Bloemfontein 👌#U19WorldCup #INDvIRE pic.twitter.com/3Eff90Nbvz
— ICC (@ICC) January 25, 2024
इंडिया ए ने इंग्लंड लायन्सला 152 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर टीम इंडिया ए ने ऑलआऊट 111.1 ओव्हरमध्ये 489 धावा केल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे दुसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 337 धावांची भक्कम आघाडी घेतली. यात सरफराजने मोठी भूमिका बजावली. सरफराजच्या 161 धावांव्यतिरिक्त देवदत्त पडीक्कल याने 105 धावांची खेळी केली. आता तिसऱ्या दिवशी टीम इंडिया ए चे गोलंदाज कशाप्रकारे खेळतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
खान बंधुंचा शतकी तडाखा
Sarfaraz Khan – 161(160) vs England Lions.
Musheer Khan – 118(106) vs Ireland.
A day to remember for brothers. 🇮🇳🔥 pic.twitter.com/FZBiJzx2VA
— Johns. (@CricCrazyJohns) January 25, 2024
आयर्लंड प्लेईंग ईलेव्हन | फिलिपस ले रॉक्स (कॅप्टन), जॉर्डन नील, रायन हंटर (विकेटकीपर), कियान हिल्टन, स्कॉट मॅकबेथ, जॉन मॅकनॅली, कार्सन मॅककुलो, ऑलिव्हर रिले, मॅकडारा कॉस्ग्रेव्ह, डॅनियल फोर्किन आणि फिन लुटन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंह, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सचिन धस, मुरुगन अभिषेक, धनुष गौडा, सौम्य पांडे आणि नमन तिवारी.